Wednesday, 18 September 2013

Marathi kavita : पाउसवेडा

तू ...
निखळ हसणारी एक चांदणी, अन मी बावरलेला एक चंद्र ...
तू ...

पावसाच्या पहिल्या सरीचा थेंब, अन मी त्या थेंबातले प्रतिबिंब ...
तू ...

सोनेरी संध्याकाळ काहुरलेली,अन मी तुझ्यात बुडणारा सूर्य हुरहुरलेला...
तू ...

एक लाट किना-याजवळ घुटमळणारी,अन मी किनारा तुला अडवू पाहणारा ...
तू ...

सावली उन्हामधली मला बिलगून चालणारीअन मी एक उनाड ढग तुला लपवणारा ...
तू ...

एक मोरपीस मोहरलेले अन मी पुस्तकाचे पान तुला आयुष्यभर जपणारातू ...
एक वेल प्राजक्त फुलांचीअन मी त्याभोवतीचा बेधुंद सडातू पावसाची एक वेडी सर ...
अन मी त्यात भिजणारा पाउसवेडा ...



कवि : _______

No comments:

Post a Comment