Saturday, 25 December 2010

नाताळाच्या शुभेच्छा!!!

नाताळाचा सण, सुखाची उधळण! मेरी ख्रिस्तमस!
तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!


Image Source : http://www.marathigreetings.net

Marathi Kavita : हेच प्रेम ना ???

ओढ़ लागली कशी ही, सख्या साजना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ????

हुरहुर ही मनी दाटे
जवळी तु नसे
दर्पणात पहाताना
तूच तु दिसे

समजाऊ मी उमजाऊ मी, कशी या मना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ???

पाहताना तुज समोरी
पापणी झुके
भाव येती ओठांवर
होउनी मुके

जागती कशा हळव्या, गोड वेदना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना???

स्पर्श होता ओझरता
होई बावरी
रोम रोम जाई फुलुनी
जाई च्या परी

तु असावा मज समीप हीच कामना
नकळत जे घडले अलगद हेच प्रेम ना???

कवि : मोहिनी

 


Wednesday, 22 December 2010

Marathi Kavita : जेव्हां मिळेल एकांत...

कधी मिळाला एकांत
तर् बसावे....एकटेच्
काढीत जून्या आठवणी
काही क्षणांच्या....हलकेच्

ते क्षण रंगवावे,
सजवावे डोळ्यांच्या पापण्यांवर
जे,...
कधी दुस-यात रमलेले,
कधी आपल्यातच् हरवलेले,
कुणावर रागावलेले..

तर कधी....
आपल्यावर् कुणी हिरुमुसलेले
अन् त्याचा रुसवा काढण्यासाठी
आपणही खोटे-खोटेच् रुसलेले

ते क्षण लांबवावे...
डोळ्यांच्या कोंदणात त्यांना
मंद हासवावे....
अशा क्षणांच्या स्मॄतीत,
डोळे भरुन येतात्
त्यातील काही आसवे
गालावरती ओघळतात

अशावेळी....
त्यातल्या काही आसवांना
हातावर झेलावे, पहावे
फक्त पहातच रहावे
आणि....

एका वेगळ्या आशेसाठी
त्यांस चवीने चाखावे
ते फक्त....

गडद स्मॄतींना पचविण्यासाठी
आणि त्या पून्हा जाग्या करण्यासाठी
जेव्हां मिळेल एकांत...........
 


Kusumagraja, Siravadakara: Eka sodha 
 Muktayana

Tuesday, 21 December 2010

Marathi Kavita : अजिंक्या

कालच डॉक्टरकाका म्हणालेत,
घरी जायला हरकत नाही
मनासारखी धम्माल करायला
आता कसलीच अडचण नाही..

सकाळी जाग येईल आता
चिमण्यांच्या चिवचिवाटाने
रात्रीची चाहूल लागेल आता
रातराणीच्या मंद सुगंधाने..

आईने भरवलेली बासुंदी पुरी
छोटीने घातलेला सावळागोंधळ
बाबांनी केलेली थट्टा मस्करी
जोडीला याच्या मैत्रिणींचा घोळ..

एवढं सगळं छान होणार तरी
आईचा चेहरा का मलूल झालाय
बाबांचा हसण्याचा गडगडाटही
असा कुठेतरी हरवून गेलाय..

त्यांची ही मूकताच बोलकी होतेय
घरी जाण्याचे खरं कारणही
आता ही निःस्तब्ध शांतताच
नेमकी उलगडून सांगतेय..

त्यांना एवढेच सांगायचंय
आता सगळे सर्वार्थाने उपभोगायचंय
कणाकणाने खंगत मरण्यापेक्षा
क्षणाक्षणाने भरभरून जगायचंय..

अजिंक्य असा हा काळ
आ वासून समोर उभा ठाकलय
पण खंबीर, समाधानी मनाकडून
मात्र, कधीच पराभूत झालय...



-- मेधा

Thursday, 16 December 2010

Marathi Katha : ऊन, वारा आणि पाऊस

चार वाजले. उतरते ऊन शाळेच्या पटान्गणात थबकले.
तिथे पीटी चे हातवारे करणार्‍या छोट्या छोट्या मऊशार केसांवर, गालावर उतरले.
तिथून ते कम्पाऊन्ड्वर रेन्गाळून थेट पलीकडल्या झाडावर सरकले.

पहिली अ चा वर्ग चुळ्बुळ करत होता. मॅडमनी फळ्यावर लिहिलेले शब्द उतरवून घ्यायचे होते.

Wind, Will Wish........

Rain, Pain, Gain....

शब्द उच्चारून मॅडम त्याचा मोठ्याने विशिष्ठ ठिकाणी जोर देऊन उच्चार करत होत्या, त्या शब्दावर बोट ठेवून. चीनूच तिथे अजीबात लक्ष नव्हत. त्याला मॅडमचे शब्द फक्त ऐकू येत होते, दिसत नव्हते. त्याची नजर त्या उन्हातच अडकली होती, त्याला मॅडमनी लिहिलेल्या शब्दाच्या उच्चारातले साधर्म्य कळून घेताच येईना. त्या शब्दमधला तसा संबंध त्याला कळेचना. त्याने फळ्यावरील नजर पुन्हा त्या उन्हाकाडे वळवली.

“लक्ष कुठे आहे तुझा चिन्मय” मॅडम म्हणाल्या, तस दचकून चीनूने पुन्हा फळ्याकडे पाहील.

“लिहिल की नाही चिन्मय?” मॅडमचा आवाज कानावर आदळलाच. चीनूने पेन्सिल घेतली. वहीत तीन रेषात शब्द लिहायच्याऐवजी ते शब्द कागदावर नुसते भिरकावले आणि तो पुन्हा त्या उन्हाकाडे पाहायला लागला.

एकदाची शाळा सुटल्याची घंटा झाली, तीही त्याला ऐकू आली नाही, पण इतर मुलानी दप्तर आवरली म्हणून त्यानही दप्तर उचलल. डबा आत टाकला, पण पाण्याची बाटली, रबर, पेन्सीली सारे काही तिथेच डेस्कमधे राहीले. तो मुलांबरोबर बाहेर पडला.
“चीनू तू पुस्तकाना कव्हर घातलीस??” वर्गातल्या एका मुलाने विचारल.

चीनूने उत्तर दिल नाही.

“चीनू, उद्या माझा हॅपी बर्तडे आहे, तू येशील?” तरीही चिनू गप्प.

"सांग ना, बोल ना चीनू !!” मुले चिनुच्या मागे लागू लागली.
 

चीनू अद्याप संपूर्ण वाक्य सलग बोलत नव्हता. सुटे सुटे दोन शब्द बोलायचा आणि तेही दोनचारदा विचारल्यावर. तेही सर्वांशीच नाही.

“चीनू तुझी चित्रांची वही मला देशील?” कुणीतरी पुन्हा विचारल.

चीनू मान हलवून हसला. त्याने दप्तरातुन वही काढून त्याला दिली.

“चीनू तुझ पूर्ण नाव काय?” चीनुला ते सांगायचच नसत मुळी.

तोही ईरेला पेटला. मुलानी आता चीनुभोवती फेर धरला. दप्तारावर ठेका धरून सुरू केल.

“चीनू, चीनू बोल बोल. चीनू बोल, चीनू बोल."

चीनूने समोरच्या मुलाला ढकलल. फेर तुटला तिथून तो निसटला, भराभर इन्द्रयणीच्या वर्गापाशी आला.

मॅडम कसल्याशा गाण्याची रिहल्सल घेत होत्या.

.....वारा सुटला तुफान,
उडती झाडांची पाने…......

बाहेरही खुपसा वारा सुटलेला, झाड एकमेकांवर रेलत होती. तो सुटलेला वारा आता चिनुला वर्गातच दिसला. सारा वर्ग त्या वार्‍याने लपेटलेला गेलेला. मुलींचे केस उडत होते. मॅडमनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे उडू पाहत होती, खडूचा चुरा सान्डत होता.

इंद्रायणीचा तिसरी "ब" चा वर्ग आता सुटला होता. बसचे होर्न वाजत होते.
इंद्रायणी मुलांच्या लोंढ्याबरोबर बाहेर आली तिने चिनुचा हात धरला आणि ती पळायला लागली.

“चीनू चाल लवकर, होर्न वाजतोय” ती म्हणाली. तिच्याबरोबर पळताना तिच्या वर्गात असाच ठासून भरलेला गाण्यातला वाराही चिनुच्या अंगाला बिलगला. कानात शिरला. आता त्याने इंद्रायणीचा हात सोडला आणि तो पळत पळत इन्द्रयणीच्या आधी बसमधे चढला. इंद्रायणी बसमधे चढली आणि बस सुरू झाली.

“चीनू तू रोजच उशीर करतोस” त्याच्या खिडकीच्या सीटजवळ बसलेला पराग म्हणाला. त्याने त्याला त्याची जागा दिली नाही. चीनू हट्टाने तिथेच उभा राहिला.

“चीनू तू इथे ये माझ्या जवळ” इंद्रायणी म्हणाली तसा चीनू धुमसत तिच्या जवळ आला.

"आपण उशीर केला ना? मग आपली सीट कशी राहील रे?" ती त्याला समजावत म्हणाली

बस सुरू झाली. तसा खिडकीतून वारा आत आला. नुकताच पाऊस सुरू झाला होता. जशा शाळा सुरू झाल्या तसा....

कदाचीत…. पाऊस येण्यापूर्वीच….....

"wind" चीनू बसच्या खिडकीबाहेर बोट दाखवून म्हणाला.

खर म्हणजे तो वाइंड फळ्यावरचा नव्हताच, तो इन्द्रयणीच्या वर्गातला होता. ....….चिनूं पाहील, त्या शाळेच्या भिंतीवरचा ऊन्हाचा पट्टा पलीकडे सरकून दूर कुठेतरी लांब झाडाच्या शेंड्यावर जाऊन शिष्टासारखा बसलेला. गोळा होऊन!

"ऊन" चीनू काहीसा मोठ्याने म्हणाला. इंद्रायाणीने त्याच्याकडे पाहील.

मघा तो "Wind" म्हणाला, आता तो "ऊन" म्हणतोय. या दोन शब्दमध्ये तिला काही दिसल नाही, जे चिनुला सापडल होत.

एरवी तिला चिनुच तुटक तुटक दोनतीन शब्दाच बोलण बरोबर कळायच. त्याच्या दोन शब्दातली रिकामी जागा बरोबर कळायची.

ती फक्त हसली त्याच्याकडे बघून. . तोही हसला सुरेखस. असा आतून हसला की त्याच्या गालाला गोड खळ्या पडत. आताही त्याच्या त्या खळीला बोट लावून ती म्हणाली "कुठे आहे ऊन?”

त्याने बोट दाखवल. आता ऊन असलेली ती झाडांची टोक मागे सरकलेली.

ते ऊनहि विस्कळीतसे…......... ते बसबरोबर पळतही नव्हते आणि एका जागी थांबलेही नव्हते

ते फक्त मधून मधून दिसत राहीले. .

मग बस त्याच्या बिल्डिंगजवळ थांबली, ते आता पुसलेच सगळे.

चीनू उडी मारुन उतरला.

“चीनू दप्तर………….!” इंद्रायणी ओरडली. “अरे वॉटर बोटल??”

“क्लासरूम…..” “त्याने संगितल.

"आई ओरडेल हा”. ती म्हणाली

त्याला पर्वा नव्हती. तो पुढे गेला मघाचे ऊन आता चक्क त्याच्या बिल्डिन्गवरच राहायला आलेले.

त्याने इंद्रायणीचा हात पकडला, हलवला. तिला ते दाखवले.

“ऊन” तो पुन्हा म्हणाला

“येस” ती आनंदाने म्हणाली. तिला त्याच्या ऊन्हापर्यंत पोहोचता आले होते.

चीनू आता बिल्डिंगासमोरच्या ग्राऊन्ड्कडे धावला. इंद्रायणी घरी चल म्हणत होती पण तिचा न ऐकता तो तिकडे धावला.

अजुन मुले यायची होती. पण काही मुल प्लास्टिकची रिंग घेऊन ती भिरकावत होती. रिंग दूर फेकण्याचा तो खेळ. चीनूने पाहील त्या मुलांची रिंग काही फारशी दूर जात नव्हती. पुष्कळदा पायाशीच नाहीतर थोडीशी दूरवर जाऊन पडत होती. मूळ विरसत होती चिनुला काही कुणी खेळायला घेतल नव्हत पण तरीही त्याने स्वतःच्याही नकळत ती रिंग उचलली आणि त्या मुलानी काही म्हणायच्या आत भिरकवालीसुद्धा!!

ती त्याला नेम धरून बिल्डिंगावरच्या त्या ऊन्हावर फेकायची होती पण ती त्या ऊन्हावर पोचलीच नाही. पण ग्राऊन्ड्च्या टोकाला लांब उभ्या असलेल्या झाडांच्या फांदीत जाऊन अडकली. इतक्यात लांब मुलानी टाळ्या वाजवल्या. अडकलेली रिंग कुणीतरी काढून आणली.

“अजुन एकदा” आणि ती रिंग त्या मुलानी आपण होऊन चिनुच्या हातात दिली.

ती पुन्हा भिरकावताना चिनुला वार जाणवला, तो रिंगबरोबर धावत गेलेला दिसला. आणि ऊनही. त्याला “विंड” आणि “ऊन” या दोन शब्दाच्या मध्येच जणू ती रिंग भिरकवायची होती. आता मात्र नेम चुकला नाही. वार्‍याबरोबर ती रिंग भिरभिरत गेली आणि चक्क त्या भिंतीवर पडलेल्या ऊन्हाला भोज्जा करून तिथेच पडली.

मुलानी पुन्हा जोराने टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्यांच्या आवाजात तो मोठ्याने म्हणाला, “Wind, ऊन……………”

त्याचे ते शब्द कुणालाही ऐकू गेले नाहीत. अगदी इंद्रायणीलसुद्धा नाहीत. ती त्याला घरी चलण्याची घाई करू लागली
रंगलेला खेळ सोडून चीनू मुकाट्याने तिच्याबरोबर दुसर्‍या मजल्यावर आला.

तिथे दोघेही सामोरा समोर राहत. दोघांच्याही आया दारातच उभ्या होत्या.

“इतका वेळ का झाला चीनू?” आईने दारातुनच विचारल.

तर चीनू म्हणाला “विंड” खर तर त्याला म्हणायाच होता रिंग. पण ते न म्हणता तो नुसतच विंड विंड म्हणत बसला.

या विंडमधे आणि रिंगमधे काहीतरी वेगळच साम्य आहे. भिरकावताना रिंग म्हणजे विन्ड्च होते. चक्क! पण हे चीनूला सांगता नाही आल.

“चीनू खाली रिंग खेळत होता. अशी मस्त फेकली आई रिंग, झुईई करून!" इन्द्रायणी दारातून आत गेली. इकडे चीनूही. दोन्ही घराची दार बंद झाली. चीनूच दप्तर आईने घेतल.

"डबा नाही खाल्ला रे? आणि वॉटरबॉटल, कम्पास रिकामाच, काय रे चीनू??" आईने विचारल.

आपण वॉटरबॉटल का नाही घेतली हे त्यालाही आठवल नाही. आईने आता त्याची वही उघडली.

आठवडी नोन्दीत रिमार्क होता “सारख्या उच्चारांचे शब्द चीनूला कळत नाहीत” तेच फळ्यावरचे शब्द टिचरने
लिहीलेले होते –

wind, will, wish....
pain, gain.....


आईचा चेहरा उतरला. कस व्हायच या पोराच!! तिने चीनूला जवळ घेतल. अगदी जवळ, मग एका कोरया कागदावर तेच शब्द लिहिले.
मग चीनूला पुन्हा जवळ घेऊन संगितल.

“बघ चीनू या सगळ्या शब्दात काहीतरी एक कॉमन आहे. तिकडे बघ” पण चीनूच अजीबात लक्ष नव्हत.
मग आईने गणिताची वही उघडली. दोन अंकी बेरीज वाजबाकी…..त्यात फारस काही चुकलेल नव्हत.
तस जरास सुखावून आईने विचारून पाहील “वींड म्हणजे काय रे चीनू?”

तसे चीनूचे डोळे चमकले.
“वारा“ तो पुटपुटला. तो नेमक काय म्हणाला हे आईला धड समाजल नाही, पण वींड म्हणजे काय हे समजल्यासारखा चीनूचा चेहरा चमकत होता. “वींड” म्हणजे काय ते चीनू आता चक्क स्वतःच्या आत अनुभवतच होता. आणि ते अनुभवण याला फक्त एकाच शब्द होता “वारा” चीनू आता जरा मोठ्यानेच म्हणाला.

चार वर्षाचा झाला तरी चीनूला त्याची भाषा बोलता येत नव्हती. केव्हातरी एकदा पाणी असा म्हणालेला त्यावरून मुका नाही हे तर कळाल. ऐकू ही येत होत, “लाख शब्द कानावर पडतात तेव्हा मुल पहिला शब्द बोलत. चीनूच्या आईला स्पीच थेरेपीस्टने सांगीतल. प्रत्यक्ष बोलता नाही आल तर आपापल्या परिसराशी निगडीत असे पाचशे तरी शब्द आणि वस्तू मुलाला माहीत असायला हवेत, असे चाईल्ड डेवलपमेंटच शास्त्र सांगत होत. चीनूच्या आईला एकुणच चीनूची फार काळजी वाटत होती. चीनू पूर्ण वाक्य बोलत नव्हता. त्याचा संवाद त्याच्या स्वतःशीच होता. तो बोलत असलेले शब्द हे एकएकटे, सुटे आणि स्वातंत्र होते आणि त्यामधले साहचर्य कुणाला कळत नव्हते.
आपल्या भोवतालच्या जगातून शब्द उचलून भाषा घडण्याच्या त्या काळात चीनू मुळी असा तोंड मिटूनच बसला होता. चीनीच्या आईला याचीच फार काळजी वाटत होती. त्याचे बाबा सकाळी ओफीसाला जातात ते रात्रीच उगवतात.

र्‍या

कसा व्हयायच या मुलाच?
सुरुवातीला चीनूची आई त्याला स्पेशालिस्टकडे घेऊन गेली. त्याला सचीत्र तक्ता दाखवला. “बी” पासून सुरू होणार्‍या शब्दानी सुरूवात झाली. "बॉल" त्याच्या ओळखीचाच होता. “बॉय"ला तो म्हणाला "चीनू". "बॅकेट"जवळ आला तेव्हा बदलीत नळ सुटलेला, पाणी वहात होते. तर म्हणाला “न्हाऊ न्हाऊ!!”. मग आईचा पदर ओढून म्हणाला “पाणी बंद” ते ऐकून स्पेशालिस्ट थोडी हसली.

"याला बॅकेट शब्द उच्चारता आला नाही पण बकेटचा अर्थ समजला. चित्रातले वाहते पाणीही बंद करायला हवे हे तो तुम्हाला सांगतो. याची केस होपलेस नाही. तुम्ही सारख बोलत रहा त्याच्याशी. त्याच नाव, शाळेच वडिलांच नाव……

मग परेडच सुरू झाली,

“वॉट इज यूवर नेम?”

“चीनू”

“नो फूल नेम?”

“चिन्मय अविनाश”

“यूवर स्कूल नेम?”

“एव्हर ग्रीन स्कूल!!”

“नाऊ टेल मे द ग्रीन कलर इन इट?”

रंगाच्या तक्त्यातले रंग समोर ठेवून आलेला प्रश्न. आणि तक्ता बाजू सारून बाहेरच्या आसमन्तात त्या हिरव्या रंगकाडे दाखवलेले बोट …….

बाहेरचे रंग समजतात तर पुस्तकातले का नाही?............

आताही घरातल्या न आवडलेल्या भाजीशी पोळी खाऊ घालताना आई काही विचारतच होती. ताज्या पावसान झाड तरारत होती. प्रखर ऊन्हान काळपटलेला पानांचा रंग तर स्वतः झाडच विसरून गेलेली. फांद्या वार्‍या‍‍ने सळसळत होत्या. चीनूच तिकडेच लक्ष गेल. त्याला पुन्हा तो “विंड” शब्द सापडला. पण तो जोडता आला नाही. झाड वेगळ सळसळत ऊभ होत आणि वारा तर आता झाडावरून उतरून थेट आत आलेला. त्याने चीनूला स्पर्श केला त्याचे केस उडवले, कॅलेंडर खाली पाडल, आई चिडली. त्यानच चीनूच लक्ष ऊडाल, अस तिला वाटल. तीन खिडकी बंद केली.

"नो. नाही . चीनू रागान म्हणाला. बंद खिडकीवर त्याने रागाने बुकक्या मारल्या

"काय चालू आहे चीनू?" आई रागाने म्हणाली. चीनूने बंद खिडकीकडे बोट दाखवल आणि घुशश्यातच म्हणाला “विंड”!!

पण आईला आता त्याला शिकवायच होत.

“व्हॉट इस युवर टीचर’स नेम?”

चीनू ओठ घट्ट मिटून.

आईने पुन्हा विचारल, आवाज चढवून.

तो म्हणाला “खिडकी”- तिकडे बोट दाखवून, ती त्याला उघडायालाच हवी होती.

“तुझ्या टीचरच नाव सांग, नंतर.”

“लीना”

“नुसता लीना?” आईचा आवाज पुन्हा चढलेला.

“लीना मॅडम”

मग एकदाचा तो तास संपला.

आज इंद्रायणी बोलवायला आली, “ग्राऊन्ड्वर चलतोस का??” म्हणून पण आईने होमवर्कसाठी रोखून धरल. "डायारीत टीचरचे रिमार्क्स वाढत आहेत"

“आम्ही खेळून आल्यावर करू न” इंद्रायणीने त्याच्यातर्फे आश्वासन दील.

“नाही मग झोपेला येतो तो. आणि सकाळी साडेआठला बस येऊन उभी राहते.” आई आपल्या निश्चयावर पक्कीच. खालून खेळण्याचे खूप सारे आवाज येत होते. मग इंद्रायाणीने चीनूकडून कसाबसा अभ्यास करवून घेतला. त्या विंड, विल शब्दाच्या ओळीत तसेच कितीतरी शब्द येऊन हजर होते तिथे!

होमवर्क संपवून दोघही ग्राऊन्डवर आली. ग्राऊन्ड्च्या कडेला गवताचे पुंजके होते. तिथे एक फुलपाखरू येऊन बसल. चीनू जवळ गेला तर ते ऊडूनच गेल. आणि चीनूला एक नवा शब्द सापडला “फ्लाय”…..चीनून इंद्रायणीचा स्कर्ट ओढला आणि पुन्हा तो नवा शब्द उच्चारला. "फ्लाय”

“हो, हो” इंद्रायाणीने टाळ्या वाजवाल्या फुलपाखराच ते चिमुकल ऊडण आपल्या खेळात घेताना त्याना फार गंमत वाटली. वार अजूनही होतच, ते तिथल्या हरेक वस्तूला स्पर्श करतच होत. चीनूला चक्क दोन शब्द जवळ जवळ सापडले. “विंड” आणि “फ्लाय” ते मोठ्याने उच्चारून त्याने विजयाने इन्द्रयणीकडे पाहील. तिलाही तो काय म्हणाला ते समजल. चीनू आता ग्राऊन्ड्रच्या आडव्या उभ्या लोखंडी बार वरुन झरझार वर चढला.

इंद्रायणी चढली नाही. ती मैत्रिणींशी खालीच खेळत राहिली. वर चढल्यावर चीनूला वार हातातच आल्यासारख वाटल. ते माघच फुलपाखरू आता उडून झाडावर बसल. आता त्याचा मघाचा रंग ओळखू येईना. तो झाडातच मिसळला. त्याचा रंग आता चीनूला एकदमच समजला. पिवळा- हिरवा किवा दोन्हीचा मिळून.

“येल्लो – ग्रीन” तो एकदम मोठ्याने म्हणाला. पण त्याचे शब्द ऐकणारे जवळपास कुणीच नव्हते. ते त्याचे त्यालाच ऐकू आले. वरच्या बारवर तर वार मस्तच सुटलेल. “ग्रीन” तो पुन्हा म्हणाला.

“विंड, फ्लाय, ग्रीन” तो ते तीन शब्द ओळीने म्हणाला. मोठ्यानच. जणू वार्‍यानेच जवळ आणले.

“अंधार पडला, चल” म्हणून सांगायला इंद्रायणी खाली आली तर तिला ते ऐकू आले.

“काय म्हणालस? म्हण पुन्हा?” ती म्हणाली.

आता मात्र चीनूला ते तसेच पुन्हा ओळीने उच्चारता आले नाहीत. ते पुन्हा वार्‍यानेच इतस्तः केले होते!

“खाली ये चीनू “ ती म्हणाली

सगळे पांगले. आता ग्राऊन्ड्वर अंधार घेरून आला. पावसाळी अंधार, झाडांचा हिरवा रंग काळा पडत चालला. ग्राऊन्ड्मधल्या एकुलत्या एक दिव्याभोवती पंखाचे छोटे छोटे किडे जमले. बाकी सारा अंधार. घराघरातून दीवे लागलेले. ते खिडक्यातून डोकावत होते, पण बाकी अंधार. चीनू सरसर खाली उतरला आणि उतरल्याबरोबर त्यान इंद्रायणीला सांगितल “ब्लॅक”

“ब्लॅक, काय? अंधार!! चीनू तुला डार्क म्हणायच आहे का?”

चीनू रडवेला झाला. त्याला डार्क म्हणायच नव्हत. त्याला रंगच सांगायचाय, तो गोन्धळला. मघाचे ओळीने उभे असलेले शब्द पुन्हा सुटे, वेगळे झालेले त्याच्या चिमुकल्या जीवाला पेलवले नाहीत. तो रडवेलाच झाला. त्याने इंद्रायणीला मारायला कधी नव्हे तो हात उगारला.

“काय झाल? काय झाल चीनू?” तीन त्याला जवळ घेतल, खूप जवळ. आज तिला त्याची भाषा काळत नव्हती दोघ निशब्द घराकडे वळली.

चीनूच्या दारात अनोळखी चपला होत्या ते पाहून तो जास्तच बुजला.

काहीतरी समजलेल आपल्याला इंद्रायणीला सांगता नाही आल हे त्याला चांगलच जाणवल.

आता कुणी अनोळखी लोक आलेले, त्याच घर त्याला एकदम परकच होऊन गेल. घरी त्याच्या बोलण्याबद्दलच सुरू होते सगळे!

“लागला का चिन्मय बोलायला?”

“हो, थोड थोड”

“आता तर सगळच बोलायला पाहिजे त्याने”

“हो न”

“एक्सपर्ट काय म्हणतात?”

“त्याचा प्रॉब्लेम मल्टिपल लँग्वेजचा असु शकतो. शाळेत इंग्रजी, घरी मराठी, कॉलनीत हिंदी, मराठी, बंगाली.”

“खर म्हणजे वेगवेगळया भाषेतूनच मुल स्वतःची भाषा तयार करतात”

सगळा बोलण आपल्याबद्दलच सुरू आहे हे चीनूला समजल, स्वतःतला अभाव खोलवर रूतला.

“तुझ नाव सांग?” कुणीतरी सुरू करून दिल.

चीनूला नाव अजीबात सांगायाच नाही.

“नाव सांग चीनू” आईनही संगितल.

“ब्लॅक” तो म्हणाला त्याला रंगाबद्दल काही म्हणायचय आणि आईला नाव हव होत. आईचा चेहरा पडला.
"नाव सांगतो तो चांगल. पूर्ण नाव सांगतो” आईने चीनूचा विश्वास जतवला.

साडेआठला बाबा आले. मग मात्र सगळी मरगळ झटकून घर हसायला बोलायला लागल. इन्द्रयणीशी जुळते तशीच बाबा आणि चीनूची वेगळीच भाषा होती.

“काय केलस चीनू आज?”

रिंग फेकण्याचा आविर्भाव करून चीनूना संगितल.

बाबाना गंमत वाटली.

“खूप लांब गेली?”

चीनूचे डोळे चमकले तो एकदम म्हणून गेला “ऊन, ऊन”

बाबानी विचारल, तस चीनू म्हणाला “फ्लाय”

“काय फ्लाय? कोण ऊडाल?”

“बटरफ्लाय” चीनू म्हणाला मग बाबानी वेगळ काही विचारायच्या आतच तो म्हणाला “ग्रीन”

“ग्रीन म्हणजे हिरवा” बाबा म्हणाले, “कुणाचा रंग हा चीनू? झाडांचा?”

“बटरफ्लाय, फुलपाखरू” चीनूने आता मराठी आणि इंग्रजी दोन्हीत संगितल. त्याला एकदम काहीतरी सापडून गेल. तो आलटून पालटून “बटरफ्लाय, फुलपाखरू” म्हणायला लागला.

फुलपाखरू हिरवे पिवळे अशा मस्त रंगाचे होते न?? बाबा म्हणाले तस चीनू म्हणाला “येल्लो” हो ते पिवळेही होतेच.

“कुठे पाहिलस तू चीनू?”

“ग्रास, गवत,” चीनू खुश.

फुलपाखराचा रंग आता हिरवा पिवळा. काळा नाहीच. अजूनही एकदोन रंग फुलपाखरात होतेच. ते शोधत असतानाच चीनूला गाढ झोप लागली.

****************************************************

आज चीनूच्या वर्गाची पी टी होती.
हात वर खाली करता करता चीनूच लक्ष गेल.
आभाळ खूपच भरल्याने दूरवरून कुठून पाऊस येतोय.

त्या रिंगसारखाच भिरभिरत. वार्‍यात मिसळलेल ते पावसाच येण चीनूला पीटी करताना दिसल. तो जसा धावतो तसाच तो पाऊसही पळतच येत होता. वारा त्याला पुढे ढकलतोय.

“चिन्मय लक्ष कुठे आहे तुझ? सरळ उभा रहा" पिटीच्या मॅडम म्हणाल्या.

चीनू पार हरवलाय, त्याला वीन्ड्च्या शेजारी आता एक नवा शब्द सापडला आहे. “रेन, पाऊस”

तो पाऊस लीना मॅडमनी दिलेल्या ओळीत उभा नव्हता, तो वीन्ड्शेजारीच उभा होता. दूरवरून तो पाऊस आता कंपाऊंडपर्यंत पोचला. त्यावरून ऊडी मारुन तो आत येईलस, चीनूला वाटल. पण त्याला ऊडी मरावीच लागली नाही.

तो विंड! त्यानच ढकलल त्या पावसाला. आणि तो पाऊस एकदम ग्राऊन्ड्वरच आला. मूलाना भिजायला मस्त वाटल. चीनू तर स्वतःभोवतीच गोल गोल फिरायला लागला. कंपाऊंडवर बसलेले पक्षी भिजून बाजूच्या फांदीवर बसलेले चीनूने पाहिले.

पाऊस वाढला. मग भिजणहे सम्पल. शाळा सुटली. घंटा होण्याआधीच सगळ्यानी भरभरा वर्गातून दप्तर घेतली. चीनू दप्तर आणायला वर्गात गेलाच नाहि. तो सरळ इंद्रायणीच्या वर्गापाशी आला. तिचाही वर्ग सुटलाच. इंद्रायणी घोळक्यातून बाहेर आल्यावर चीनूने तिचा हात ओढला आणि तिला व्हरांड्यात आणल. आडवा तिरपा पाऊस – त्याने सगळा व्हरांडा भिजलेला.

चीनून दूरवर मघा पाऊस येताना दिसला, तिकडे बोट केल पण आता पावसाच तस येण पुसलच गेल. सर्वत्र पाऊसच! त्याचे कुठून येणे कुठे जाणे आता चीनूला कळेचना.

मग हातात हात घेऊन दोघ त्यांच्या बसकाडे धावली. त्याना घेताच, बस आज सुरू झाली नाही. अजून मुल यायचीच होती. चीनू इंद्रायणीजवळच बसला आणि त्यान तिला हळूच संगितल. बुजत, घाबरत, दोन शब्द जोडुन “रेन कम”!

मग तो जरा धिटाईने म्हणाला “विंड कम”!

आता जास्त विश्वासान म्हणाला “ चिमणी फ्लाय” मग स्वतःलाच काहीतरी नवीन सापडल्यासारख म्हणाला “बटरफ्लाय”

आता इंद्रायणीने त्याच एक गाणच बनवल.

पाऊस येतो, वारा येतो,
चिमणी ऊडते, ऊडते फुलपाखरू,
चीनू भिजतो, आम्ही भिजतो,
भिजले फुलपाखरू…………….

इथपर्यंत आल्यावर बस सुरू झाली. सगळी मुल आलेली. शेवटली ओळ मग इंद्रायणीने “बस झाली सुरू” अशी म्हणून टाकली,

“म्हण चीनू” इन्द्रायणी म्हणाली. चीनू थोडासा बावरला. मग म्हणाला “रेन कम, विंड कम”

आता पूर्ण बसच गाण म्हणायला लागली. ठेक्यात आणि तालात. चीनूही त्यांच्या सोबत म्हणू पाहत होता,

चीनूला इंद्रायणीच ते गाण आवडल. ते त्याला आवडलेल्या रेन आणि विंडबद्दल आहे हेही समजल. एका कळण्यातून दुसर कळण आणि दुसर्‍यातून तिसर……..

चीनूच्या घरपाशी बस उभी रहिली.रहिली.इन्द्रायणी आणि तो उतरले. आज ग्राऊन्डवर कुणी नव्हत. फक्त एक भिजलेल फुलपाखरू त्या गवताच्या पुंजक्यावर.

“फुलपाखरू” चीनू एकदम स्पष्ट म्हणाला.

“येस” इंद्रायणी आनंदाने चित्कारली, “ बघ चीनू, हे फुलपाखरू भिजल, थंडी वाजतेय त्याला!!”

बसमधल गाण म्हणत म्हणत इंद्रायणी चीनूसोबत आपल्या मजल्यावर आली.

दोघांची दार उघडीच होती, आया दारात वाट बघत.

भिजलेल्या दोघाना बघून आईने विचारल “अग छत्री?”

“छत्री, बसमधे राहिली” इंद्रायाणीने संगितल हसत हसत.

“चीनू, आणि दप्तर रे!!” आईने विचारल.

चीनू गालाला छानशी खळी पाडत गोड हसला.

मग दारातून आत शिरण्यापूर्वीच त्यान सुरू केल, अजुन आपल्याच घराच्या दारात उभ्या असलेल्या इन्द्रायणीकडे तिरपे पाहत मघाच इंद्रायणीच गाण!

पाऊस येतो…….
वारा येतो……..
चिमणी ऊडते………
ऊडते फुलपाखरू…….

चीनूचे उच्चार बरेच स्पष्ट होते. तो ते गाण पाठच म्हणत होता.

……….यातले रंग त्याला अखेर शब्दात सापडलेच, तो वेगान आणि विश्वासान आईकडे झेपावला.



समाप्त.

लेखिका : आशा बगे

Source : Orkut.com
| Marathi Story |
 

Tuesday, 14 December 2010

Marathi Charoli : नविन चारोळ्या

तो तुझ्या गावातला पाऊस
माझ्या गावात फिरकलाच नाही
आयुष्यातला वैशाख असा
अजून कुठं संपलाच नाही.




अपेक्षाभंगाचं दु:ख तरी कुठलं
अपेक्षाच नव्हती तर?
माझ्या मनाचं काय घेवून बसलीस
तुझ्या मनातच नव्हतं तर?




नसतेस कधी मागे
तू ही मला छळण्यात
ओठ असतात मुके आणि
भलतेच असते डोळ्यात.




अशीच सारखी तु माझी
कायमच परीक्षा पहातोस
खर सांग तु माझ्यावर नक्की
कितपत विश्वास ठेवतोस




कोण कुणाची परिक्षा पहातंय
हे तर सगळं जग पहातंय
विश्वासाचं म्हणशील तर तो
पानिपतात गेल्याचं माहितंय.




तू म्हटलेस "जा"
मी वळलो फक्त
"परत ये" म्हणतेस कां
पाहिले होते फक्त.




ठरावामध्ये ठरतं का कधी
अश्रुंचं येणं-जाणं
आठवणी मनात दाटल्या कि
आपसुक डोळ्यांत साठतं




दोघे ही अबोल राहीलो म्हणुन
शब्दांना वाट फुटलीच नाही
तु बोलशील तु बोलशील असं म्हणत
नि:शब्दता कधी ओसरलीच नाही




शुन्याला एकदा भेट म्हणतोस
शुन्यातुन आधी बाहेर पडु तर दे
वजाबाकी करुन निरुत्तर झाले खरी
पण एकदा तरी उत्तर तपासुन बघु दे




तुझा दुसरा प्रश्न आला
उत्तराच्या आधीच
मी तर निरूत्तर असतोच
पहिल्याच्या आधीच

चारोळी लेखक : डॉ. अशोक आणि निशिगंधा

Sunday, 12 December 2010

Marathi Kavita : मैत्रीचा श्वास

तुझ्याविना हे जीवन सारे , व्यर्थ वाटते मित्रा
तू नसताना आनंदावर विरझन पडते मित्रा
कट्ट्यावरती होतो मजला कधी तू असण्याचा भास
तुला अन मला जोडणारा हा मैत्रीचा श्वास ||१||

गोडीगुलाबी भांडणतंटा कधी दंगा केला
आठवूनी मग त्या क्षणांना जीवही गहिवरला
पाझर फूठे आठवणीना अन येई तुस्या स्प्रे चा वास
तुझ्या स्मृतीने दाटला मग हा मैत्रीचा श्वास ||२ ||

गुपित सारे मनात दडवून कधीच बोलला नाहीस
जाणीव झाली मलाय तेव्हा तूच उरला नाहीस
का रे दिला लढा एकटाच या कर्करोगास
या शंकेने गोठला मग हा मैत्रीचा श्वास ||३||

भोगून यातना सोसून दुख शिंपडली तू सुख
त्या प्रेमाने हि मिटली नाही हि मैत्रीची भूख
तुझ्या संकल्पाने दिले आव्हान जणू मृत्यूस
रोजनिशी हि वाचताना दाटला हा मैत्रीचा श्वास
दाटला हा मैत्रीचा श्वास ,मित्रा हा मैत्रीचा श्वास ||४||



कवि : गजानन

Svatantryottara Marathi kavita, 1961-80 
Adhunika Marathi kavita: Kahi rupe-kahi ranga 

Saturday, 11 December 2010

Mrathi Kavita : भोग...

प्रभाती राम प्रहराला
भेटला पहाटवारा
स्तब्ध्तेत जगण्याचे तो
भोगित दु:ख होता

सावळ्या कृष्ण मेघाला
भेटलो होउनी राधा
न बरसता जगण्याचे तो
भोगित दु:ख होता

शरदातल्या चंद्रकलेला
भेटला सावला मेघ
चांदण्याविना जगण्याचे तो
भोगित दु:ख होता

माझिया ही प्रियाला
भेटले असेच की प्राक्तन
तीळ तीळ तुटत जगण्याचे तो
भोगित दु:ख होता

कवि : सुनील जोशी
Marathi Modern SongsChar Divas Premache (Marathi)Tingya (Marathi)

Saturday, 4 December 2010

Marathi Kavita : आपलेच दांत...

काही गोष्टी जाणवून देखील
मनातच वागवायच्या असतात,
ओठ जर आपले तर मग
दांत काही कुणी परके नसतात!

ओठांच्या रेशमी महीरपींतच तर
दांतांची धार जपली जाते,
आणी लपली देखील!
हा दोष ना आपला, ना त्यांचा
असलाच तर रचनेचा.....
तो वेंगाडून दाखवायचा नसतो!

कधी तरी जीभ येतेच दांतांखाली-----
तिचा पडलाच जर तुकडा,
तर गिळून पोटांत घ्यायचा असतो.....

मग ओठांची महीरप हंसरी राखतांना,
दातांची धार अधीकच परजतांना
जाणवला जरी जीभेचा सल
तरी तो मनांतच वागवावा लागतो!!!



कवि : ______



Thursday, 2 December 2010

Marathi Kavita : सत्य

प्रत्येकाच्या आभाळाचा रंग निळा असतोच असं नाही!
आणी निळ्या आभाळाखाली जगणार्‍यांची तरी
सगळीच स्वप्नं निळी कुठे असतात?

खरं तर निळ्या स्वप्नांची गरज
लालभडक आभाळाखाली जगणारांनाच!

कर्दमांत लोळणार्‍यांसाठी तर कधीकधी
लाल देखील आभाळ नसतं----------
पण म्हणून काही ते जगणं सोडत नाहीत!!

माथ्यावर आभाळ आहे की नाही ते बघायला सुद्धा
रिकामा वेळ असावा लागतो-----------
आणि त्याचा रंग शोधायला प्रकाश!!!!!

जगावं की मरावं ह्याची चिंता
हेम्लेटसारख्यांनी खुश्‍शाल वहावी--------
माथ्यावरच्या निळाईची शान राखायला.......
सगळ्या हेम्लेटांच्या आयांसाठी मात्र
ऐश्वर्यमहालाचं छतच सत्य असतं!!!!!!



कवि : प्रभा

Wednesday, 24 November 2010

Marathi Kavita : उगाच नको

उगाच नको
माझे शब्द हरवून गेले
माझे मला फ़सवून गेले
अतःकाळच्या वेदना जणु
अशा जखमा रूजवून गेले

आता बोलणार कोण ?
रूसणार कोण? हसणार कोण ?
गेले काय राहिले काय
उधळला डाव हिशोब मांडणार कोण?
एकदा आले पक्षी दोन
भेटून उडाले दिशांना दोन
दोन घडीची संगत त्यांची
जीव गुंतला का सांगे कोण

उडतांना ते सांगून गेले
आयुष्याचे ओझे करायचे नाही
जगायचे नाटक करायचे नाही
पुन्हा भेटण्यास चुकायचे नाही

पहा ओठावरती आले हासू
कात टाकूनी जन्मा येऊ
शब्द आता शोधुन काढू
त्यांना नवे रूप देऊ

पहा फुटले नवे धुमारे
भरली पुन्हा पानेच पाने
जन्मा आले हे गीत पहा
फुलले स्वप्न मनी पहा

झटकून टाकली जळमटे
मातीतून नवा कोंब फ़ुटे
जिंकले कोण हरले कोण
हिशोब आता उगाच नको

कवि : सोनाली जोशी

Tuesday, 23 November 2010

Marathi Kavita : आज खुणवी नविन गुन्हा

काही कळत नाही, ठेच लागत जाइ, जरी पडलो पुन्हा पुन्हा
मी काटली सजा, माझ्या भरल्या ईजा, आज खुणवी नविन गुन्हा

मी वळत गेलो, मन जाळत गेलो, केल्या कितीक तडजोडी
तरी मधुनचि, कधी वाटे काढावी, सा‍र्‍या दुनियेची खोडी
उरे कोळसा काळा, सुंभ जळाला सारा, पण पीळ त्‍याचा जाईना
मी काटली सजा.......

मी चांगला झालो, मी वायाही गेलो, कधी झालो मी व्यवहारी
ल्यालो फाटके कधी, किंवा कापडं साधी, कधी घातली भरज़री
तरी कपाटात, अजुनही माझ्या, ठेवणीतला सदरा जुना
मी काटली सजा.......

मी फसलो खूप, उगा हसलो खूप, कधी उगीच गहिवरलो
कधी वेडा मी झालो, कधी शोधतांना काही, स्वतःच हरवलो
पण जाऊदे सारे, एक वाटते खरे, की जगलो क्षणा क्षणा
मी काटली सजा.......

कवि : आशिष

Friday, 20 August 2010

Marathi kavita : बायको म्हणजे - विडंबन

बायको म्हणजे
नुसती कायली
थंडीचा वणवा करणारी
बायको म्हणजे
पावलोपावली
नवर्याला वेठीस धरणारी

बायको म्हणजे
सांता-बंता
हसण्यासाठी चोरीचा
बायको म्हणजे
अवघड गुंता
फसण्यासाठी दोरीचा

बायको म्हणजे
भलती केस
आशेवर झुलवणारी
बायको म्हणजे
बोटाला ठेस
विसरलं दु:ख खुलवंणारी

बायको म्हणजे
राजकारण
पंचवार्षीक खेळण्यासाठी
बायको म्हणजे
जाच-कारण
घरी लवकर जाण्यासाठी

बायको म्हणजे
चढा ओढ
नकोनकोशी वाटणारी
बायको म्हणजे
कुत्तर ओढ
अस्तित्वाला चोपणारी

बायको म्हणजे
काळा मेघ
सगळीकडे कोसळणारा
बायको म्हणजे
अनियन्त्रिक वेग
चालता चालता ढासळणारा

कवि : रमेश ठोंबरे


१) सर्वप्रथम तुषाराम महाराजांची माफी मागून ....
२) माझ्या सह सर्वांच्या सर्व बायकांची माफी मागून हि गुस्ताखी केली आहे .....

सावधानतेचे ७ इशारे :

१) कवितेतील मतांशी स्वतः कवी हि सहमत नाही ......
२) कवितेतील मजकूर आपल्या जीवनात हानी पोहोचउ शकतो तेंव्हा सावधान.
३) कविता scrap करताना कवीचे नाव टाळावे हि विनंती.
४) scrap चुकून बायकोने वाचल्यास होणाऱ्या परिणामांची जवाबदारी पूर्णतः आपली .... म्हणजे तुमची.
५) उद्या मलाच scrap करू नका म्हणजे मिळवली.
६) विवाहित पुरुश्यानी इकडे न फिरकलेलच योग्य.
७) फक्त हसण्यावर न्या हसं करून घेऊ नका.

Marathi Kavita : आज माझे पाकीट हरवले

आज माझे पाकीट हरवले
.
.
.
होते थोडे फार पैसे
काही माझे कार्डस होते..
त्यात फर्स्टक्लास चा पास ही होता
आणि काही चिटोरे होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
सोबत हरवला तो फोटो
आपण एकत्र काढला होता
हरवला तो एक कागद ज्यावर
तुझ्या प्रेमाचा कबुलीजबाब होता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवली ती सारी तिकिटे
एकत्रित आपण जेथे प्रवास केला होता...
अन त्या तिकीटावरही तू
हसत हिशोब मांडला होता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवली ती गुलाबाची पाकळी
जे फुल तुला मी दिले होते..
माझ्याशी अखेरचा निरोप घेताना
फुल ते हसत परत केले होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवला तो कागद सोबत
ज्यावर तुझ्यासाठी काही कविता केल्या होत्या
होत्या वाचून दाखवायच्या तुला एकदा
पण कवितांना त्या अर्थ राहिला नव्हता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवले ते पत्र सोबत
कधी काळी तुला लिहिले होते..
प्रेमाचे शब्द ऐकण्या अगोदर..
शब्दांनाही तू नाकारले होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
होता तुझा एक फोटो
ज्याच्याशी माझा संवाद असायचा
तुजवरील प्रेम ऐकताना
फोटोही कधीतरी लपून रडायचा...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवल्या त्या आठवणी सार्या
ज्यांच्या आधारे मी जगत होतो..
मिळाले पाकीट तर द्या हो पुन्हा मला
आठवणींविना त्या मी अधुरा होतो....मी अधुरा होतो...


कवि : शिरीष सप्रे

Friday, 13 August 2010

Marathi Kavita : ती तशीच राहू दे ना मला

ती :

आता करायचच आहे कुणाशी तरी
तशी दोन-चार मुलही सांगून आली
कोणी बघितलाच असशील तर सांग त्याला
काल शेवटी आई पण बोलली

म्हटलं विचाराव तुला
तू आहेस का तयार
अजूनही आवडते तुला
का सोडलास विचार

मी :

धाड धाड धाड
ती फक्त बोलतच होती
सुटली तेव्हा अशी काही
थांबायचं नावच घेत नव्हती

शांतपणे मी सारे ऐकून घेतले तिचे
नंतर उगीच माझे मलाच हसू आले
खेळणे झाले कि राव, तुमचे हे असे
सगळेच आले आणि कसे खेळून गेले

तेव्हा नाकारले होतेस, जोरात हसून
मी पहिलेच नाही तुला, त्या नजरेतून
दुसरी चांगली मिळेल, मला जा विसरून
मग थट्टा केलीस माझी, चार चौघींना सांगून

मी मात्र वेडा तुझ्यावर प्रेम करणारा
झिडकारलेस तरी तुला दुरूनच पाहणारा
त्याग म्हणजे खर प्रेम सगळ्यांकडून ऐकणारा
सुखी रहा म्हणत तुझे स्वप्न रोज जगणारा

का वागलीस तेव्हा अशी ... माहित नाही
काय आता मनात तुझ्या ... काही कळत नाही
काय हवय मलाही ... काही उमजत नाही
बायको म्हणून भेटशील पण प्रेम .... माहित नाही

करायचच आहे कुणाशी तरी
मग कोणीही भेटेल कि तुला
मी जिच्यावर प्रेम केल
ती तशीच राहू दे ना मला

कवि : रुपेश सावंत

Thursday, 29 July 2010

Marathi Kavita : बोल

हे आजचे गीत आहे, आजचा हा उमाळा..
काल ही नवाच होता
आज ही नवा नवा..

हा आजचा भाव आहे, आजची ही कविता..
कालही खराच होता
आज ही खरा खरा..

थांबल्या जगात तरीही, राग तोची तो जुना..
कोत्या जगात अजूनही
आलाप तोची तो पुन्हा..

हा आजचा बोल आहे, आजची ही दुविधा..
कालही दऱ्याच होत्या
आज ही दऱ्या दऱ्या..!

कवि : स्वाती फडणीस

Monday, 26 July 2010

Marathi Kavita : त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस...

सकाळी उठलो तर वाटलं कुणी तरी भेटणार
आपल्या हृदयाचा ठाव कुणी तरी घेणार
योगायोगानेच आपली ओळख झाली
वाटलं मनाला कुणीतरी जवळची भेटली

मैत्रीच्या झाडात आपल्या लागले प्रेमाचे फळ
संकटांच्या क्षणीच नेमके दिले तू मला बळ
मैत्रीच्या नात्याला तू एक नविनच आयाम दिलं
एक अजुन बहिण भेटल्याने मन स्फंदून गेलं

पहिले रोज काही नविन घडत नव्हतं
आता मात्र सांगायलाही वेळ पुरत नव्हतं
काय सांगू काय नाही असं व्हायचं
तू समोर आलीस की सगळ विसरायला व्हायचं

आठवते का ग तुला पहिल्या राखिला तू मला राखी पाठवली नव्हतीस
सख्या भावांच्या गर्दित तू या मानलेल्या भावाला विसरली होतीस
विचारल तर म्हणालीस अरे घरी वेगळ वाटेल
तुझ्या माझ्या नात्याचं सत्य कस कोणी समजेल

तेव्हाच मी ठरवलं आपल्या मनाशी
एक वेळ अशी येईल जेव्हा तू मला धरशील उराशी
आठवेल तुला आपण क्षणोक्षणी किती भांडायचो
उगाचच खिलज्या पाडून पुन्हा मनवायचो

एके दिवशी नको तेच अघटित घडले
तुला तुझ्या रक्ताच्या नात्याचं कुणीतरी भेटले
अनवधानानी तू त्याच्याशी जवळीक करत गेलीस
रक्ताच्या भावापुढे मानलेल्या भावाला विसरून गेलीस

दिवसांमागुन आठवडे महीने निघून गेले
आपले मात्र बोलायाचे तसेच राहून गेले
एकदा भांडणाचा उद्रेक झाला
तुझ्या त्या रक्ताच्या भावाने आपला सम्पर्कच मिटवला

आजही तुझ्या आवाजाची वाट बघतोय
प्रेमाने "दाद्या" म्हणशील म्हणून रोजच मरतोय
एकदा ताई म्हणालो नाही याचा का एवढा बदला घेतलास
माझ्या वाटचा घास तू त्याच्या तोंडी भरवलास

कधीही विसरु नकोस आपल्या या भावाला
धाकटी बहिण असुनही तुला तिचाच दर्जा देणार्याला
कधी तरी माझी आठवण काढशील का ग
मानलेल्या या भावाला आठवशील ना ग

असशील तू दूर सध्या तरी माझ्या मनात राहशील
हाक तर मारून बाघ सदैव मला तुझ्यासाठी उभाच बघशील
मानलेल्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतं का ग रक्ताचं नातं
फुल तरी विसरते का आपल्या झाडाचं पातं

आपल्या प्रेमाला कधी विसरु नको
एव्हढच मागतो की त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस...

कवि : अक्षय

Friday, 23 July 2010

Marathi Kavita : मी कधीच जानल होत...

आज तुला मी नकोय
हे मला कधीच कळल होत
तू सोडून जाणार आहेस
मी कधीच जानल होत


तुझ लग्न ठरलय
तुझ्या वागन्यातुन समजत होत
दुसरीकडे ओढ़ लागलेल तुझ मन
मला समजुन येत होत


खुप वाईट वाटत होत
पण काहीच सुचत न्हवत
दिवसातून हजारो मेसेज करणारी तू
पण आता सगळ बंद होत


खुप आठ वन येते म्हणत
आय लव यू च बोलन
आता संपून गेल होत
हे अचानक अस होइल अस कधीच वाटल न्हवत


प्रतेक मिनिटाला मोबाईल कड़े पहान
आज ही तसच चालु होत
ये मूर्खा फोन करना
तुझा आवाज ऐकायचाय
अस बोलणार कोणच उरल न्हवत


वरुण हसताना दिसलो तरी
मन रडन सोडत न्हवत
तुझ्या विरहात जगन
खुप कठिन झाल होत


देवा माझ्या स्वीट हर्ट ला उदंड
आयूष्य दे एवढच मागण
तुझ्या चरना जवळ होत


(कालजी घे मी कसाही जगेन पण तू सुखी रहा
तिला एवढच सांगायच होत ......आइ लव यू )

कवि : विनोद शिदें

Wednesday, 21 July 2010

Marathi Kavita : बाबाही आपुले चांगले मित्र असतात...

बाबाही आपुले मित्र असतात..
मनात विचाराचे वादळ असे
डोळ्यात अश्रू दाटुनी उभे
सांगावे कोणाला समजेनासे झाले
या दुखातुनी बाहेर यावे कसे..

उदासी नैराश्य एकदम आले
हासर्या चेहर्याला रडवूनी गेले
हास्य चेहऱ्यावरचे नाहीसे झाले
एकटेपणाचे घर मी गाठले..

अचानक एक हाक कानावरी आली
अंधारी जीवनातूनी बाहेर काढणारी
हताश मनासी एक सामर्थ्य देणारी
उदास चेहर्यावरी हास्य उमलवणारी ...

होती हाक ती मैत्रीसाठी त्यांची
कधी न ऐकली मी गोष्ट ज्यांची
भुलवुनी चुका माझ्या सार्या
बाबांनी केली होती मैत्री माझ्यासाठी

नैराश्यात हाथ देऊनी बाहेर त्यांनी काढले
भूतकाळातील चुकांनी डोळ्यात अश्रू दाटले
ना मित्र ना मैत्रिणी कोणी कामासी आले
आज माझ्या बाबांनीच मजसी वाचवले..

चेहऱ्यावर माझ्या हास्य उमलले
नैराश्याचे जाळे ते सारे फिटले..
हताश मनासी पुन्हा एकदा
लढा देण्यासी सामर्थ्य त्यांनी दिले

जन्मदाते शेवटी आपलेच असतात
भले आपले व्हावे याच विचारात असतात
नका दुखावू त्यांसी तुम्ही कधी
बाबाही आपुले चांगले मित्र असतात...चांगले मित्र असतात...



कवि : शिरीष सप्रे

Tuesday, 20 July 2010

Marathi Kavita : नाहीच हे तुला कळले ...

आठवणींचा धागा पकडून ,
उलट दिशेने मी चालले
स्वतःची वाट विसरले
नाहीच हे तुला कळले ...

अंबरी पाहून हसरे तारे,
तुलाच मी चन्द्र समजले
डोळे क्षणभर माझे फसले
नाहीच हे तुला कळले ...

क्षणभर सुख वाटले,
विमनस्कतेने घेरले
वियोगाने होरपळले
नाहीच हे तुला कळले ...

स्वप्नात तरी यावा म्हणून,
पापण्या मिटवून पाहिले
झोप माझी राहिली कुठे ?
नाहीच हे तुला कळले ...

कवि : अस्मिता

Monday, 5 July 2010

Marathi Kavita : पावसा , कालपासून भलताच पेटलायस...

बघ ना थोड .......
पावसा , कालपासून भलताच पेटलायस !
पावसा , कालपासून भलताच पेटलायस !
पावसा .!!!!!.....
ये म्हटल्याने येत नाहीस ...
जा म्हटल्याने जात नाहीस ...

बघ ना थोड त्या काळ्या आई कडे
दमली री बिचारी ती.... तुझी वाट पाहून
ते सकाळी गोड असलेलं सोनेरी किरणं...
ते सकाळी गोड असलेलं सोनेरी किरणं...
दररोज दुपारी असुरांचा राजा बनतो रे
काळीज तोडला रे बिचारीच..........

बघ ना थोड त्या काळ्या आई कडे...
किती सुंदर होती रे ती धरणी माता..फुलांनी फुललेल्या बागेत...झाडांन सोबत गाणं गाणारी..
अन वाऱ्याची साथ असायची संगीताची...
किती शांत सावली....हिरवीगार....त्या झाडांची
किती चिव चीवाट होता त्या पाखरांचा..
किती सुखी होती रे तिची पोर....
जेव्हा तू सतत बरसायचास...अन त्या असुरांच्या राजा ला पुन्हा सोनेरी किरण बनवायचास..

पण तू आता पुन्हा पेटलायस......
पुन्हा त्या पोरांच्या आश्या जाग्या केलायस
पुन्हा ते वार वाहायला लागलय.....
पुन्हा ती वाट पाहतायत नदी नाले....दऱ्या मधून वाट शोधायला..
पुन्हा ती आपली आई सुंदर बनायचा विचार करतीय...झाडांन सोबत गाणं गायला..
त्या सोनेरी किरणांचा मनमुक्त आनंद लुठायला........

कवि : रवी

Saturday, 3 July 2010

Marathi Kavita : तिचेच प्रतिबिंब दिसले..

झोपेत पाहायचो स्वप्नसुंदरी
साक्षात आयुष्यात ती आली
येउनी बेरंगी जीवनात माझ्या
रंगांची उधळण करुनी गेली..

फुलासारखी नाजूक अशी
कोमल हास्य तिच्या गाली
होते वाटत स्वर्गात मी जणू
अशी अप्सरा मला मिळाली..

नव्याचे ते नऊ दिवस संपले
अप्सरेचे खरे रूप दिसले
टाकला होता ओवाळूनी जीव जिच्यावर
तिनेच हृदयाचे तुकडे केले..

देऊनी सर्वस्वी प्रेम तिला
दोषी अखेरीस मला ठरवले
प्रेमाच्या बुडत्या नौकेला होतो वाचवीत
अथांग सागरात मलाच बुडविले..

केले वार अनेक हृदयावरी त्या
रक्ताचे अश्रू हृदयातूनी ढळले
प्रेम माझे कधी न जाणलेस
रक्तात हि तिचेच प्रतिबिंब दिसले...तिचेच प्रतिबिंब दिसले....



कवि : शिरीष सप्रे

Sunday, 20 June 2010

Marathi kavita :- सखे, कुठं मी चुकलो, कशास मुकलो...

सखे, कुठं मी चुकलो, कशास मुकल
रोज याचा हिशोब मी करायला बसतो
सगळी देणी-घेणी अगदी अचुक मांडतो
पण सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, प्रेमाची वा मैत्रीची
मी कधीच कींमत करत नाही
पण तुझ्या दग्याची
मात्र मी कींमत करतो
सखे तुझ्या दग्याला
मी फ़क्त एका रुपयातच मोजतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे जाताना तु मला
व्यवहारी जग दाखवुन गेलीस
त्याच व्यवहारी जगात आज
मी लाखोंची उलाढाल करतो
सखे, या दुनियेतला प्रत्येकजण मला
आज या पैश्यामुळेच सलाम ठोकतो
पण सखे, हा एक रुपया माझ्या
राज्याच्या हुद्दयाला रंक ठरवतो
मी जिंकलेल्या युध्दालाही
ह रुपयाचा एक अंक हरवतो

सखे, या रुपयाला ना
बाहेर कुणीच विचारत नाही
पण माझ्यासमोर मात्र
ताठ मानेने जगतो
सखे, लहानपणी मी गणितात
शिष्यव्रुत्तीने पास व्हायचो
पण या बेरीज-वजाबाकीच्या साध्या
गणितात आज मात्र मी नापास होतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, मला कधी कधी तुझी आठवण येते
तेव्हा मी या रुपयाकडे नजर रोखुन पाहतो
त्यातला तो एक आकडा
ना मला सारखा खुणावतो
की तु एकटाच आहेस, आणि एकटाच राहणार
सखे, माझ्या डोळ्यांतुन ओघळणारा थेंब मग
त्या रुपयावर हलकेच विसावतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, माझा मित्रानं
मला एकदा विचारलेल
की "अरे तु आज ईतका
श्रीमंत तरी हा फ़ुटकळ
एक रुपया तुझ्याजवळ का असतो?"
सखे मी त्याला म्हणालो
"अरे हा "भाग्याचा" रुपया आहे
म्हणुन याला मी नेहमी खिशात ठेवतो"
आणि हो "हा फ़क्त ज्याच्या नशिबात आहे
त्यालाच मिळतो" फ़क्त त्यालाच मिळतो

Marathi Kavita : पंख पिंजरयातच अडकले होते...

पंख पिंजरयातच अडकले होते...
आज का डोळ्यात माझ्या
पाणी पुन्हा दाटले होते...
कासाविस या व्याकुळ आतम्यात
आभाळ भरून साठले होते...

आज का मन पुन्हा
माझ्यातच हरवले होते...
मज स्वतः आज बेरंग करून
जग रंगात रंगत होते...

आज एकांतात ह्रदय माझे
आपलीच स्पंदन शोधत होते...
आज स्वतःशी हसून सुद्धा
मन आतून रडत होते...

आज पुन्हा काही कवडसे
माझी सावली शोधत होते...
पालटून आज काळlची पाने
मज स्मरण तुझे होत होते...

आज तुझ्या नसन्याने पुन्हा
ह्रदय अंधारात धड़कले होते...
बंध जरी तुटले सारे
तरी पंख पिंजरयातच अडकले होते...

पंख पिंजरयातच अडकले होते...
अडकले आहे ....


कवि : डॉ. आर्चित

Saturday, 19 June 2010

Marathi Kavita : मला एक नवीन क्षितीज सापडलंय

"मला एक नवीन क्षितीज सापडलंय".
होय,
जीथं सूर्य कधी मावळतच नाही
अन काळोखाला अस्तित्वच नाही
जीथं भूतकाळाच वास्तव्यच नाही
अन आठवणींचा प्रश्नच येत नाही..
होय मला . .. ... ....

जीथं सुख सोबत सोडत नाही
अन दुख: कुठचं दिसत नाही
जीथं प्रेमाला सीमाच नाही
अन मत्सराला थाराच नाही ..
होय मला एक .. ... ....

जीथं आपल्या भावनांना कदर आहे
होरपळलेल्या मनाला मायेचा पदर आहे
जिथली नाती बंधनातील नाहीत
तरीसुद्धा अजून ती सांडलेली नाहीत..
होय,मला एक नवीन ... ....

जीथं मला कोणाचीच भिती नाही
अस्तित्व सांगणारी स्वताची सावलीसुद्धा नाही
जीथं कोणताच ऋतू मला लागू नाही
अन उन-पावसाच खेळ माझ्या जीवनातच नाही..
होय,मला एक नवीन क्षितीज ....

जीथं वाटासुद्धा दुहेरी नाहीत
फक्त पुढ चालायचं माघार मात्र नाही
जीथं प्रश्नचिन्ह कुठचं दिसत नाही
उत्तर मिळेपर्यंत प्रश्नच उरत नाही ..
होय,मला एक नवीन क्षितीज सापडलंय"

क्रमश: ......

कवि : संदीप शेलार, सातारा.

Wednesday, 16 June 2010

Marathi Kavita : गेले ते दिन गेले

विनाकारण रात्रभर रंगणारे संवाद
रात्री ३ ला झटका आल्यासारखे
वडाळा ते दादर चौपाटी फिरणे
शम्मी देव आनंदचे म्याटिनी सिनेमे

बादल थिएटर मधे बाजुच्या सीटवरचा
नाचला अचानक आणी नाचलो होतो
मी पहिल्यांदा झपाटल्या सारखा
भगवान दादाच्या अलबेलावर
आणी सगळे नाचले नंतर
सगळया मुंबईत थियेटर मधे
सिल्वर जुबिली होईपर्यंत

तो emergency चा ephoria
त्यानंतरच्या नसबंदीच्या गोष्टी
जनता पार्टीची हवा ,दोन तोंडांचा जनसंघ
हत्तीवरची सवारी करून परतलेली इंदिरा

होस्टेल वर पहिला घेतलेला rum चा घोट
एकेक सिगरेट ३-४ जन फुकायाचे दिवस
एका पाठोपाठ एकेकीवर जीव अड़कायचे दिवस
भांडणं ,रुसवेफुगवे आणी एका सिगरेट वर
नाहीतर rum च्या कॉरटरवर मांडवळीचे दिवस

....गेले ते दिन गेले

Wednesday, 9 June 2010

Marathi Kavita : तराजू

भाषा आहे पण शब्द नाही
शब्द आहेत पण धैर्य नाही

धैर्य आहे पण काळीज नाही
काळीज आहे पण भावना नाही

भावना आहेत पण संवेदना नाही
संवेदना आहे पण वेदना नाही

वेदना आहे पण उपयोग नाही
उपयोग आहे पण सवड नाही

सवड आहे पण ईच्छा नाही
ईच्छा आहे पण आवड नाही

आवड आहे पण पश्चाताप नाही
पश्चाताप आहे पण व्यक्त होत नाही

व्यक्त होतो पण माणूस नाही
माणूस आहे पण, पण आयुश्यच नाही... आयुश्यच नाही...


कवि : सुरज

Tuesday, 8 June 2010

Marathi Kavita : माझा लिलाव झाला

मला न कळता कधीच माझा लिलाव झाला
मनास रोखून ठेवण्याचा स्वभाव झाला ...

उचलत गेलो असंख्य ओझी कुणाकुणाची
असून घायाळ,चालण्याचा सराव झाला ...

सुखा,खुशाली नकोस सांगू कुणास खोटी
ख-या परीक्षेत आज माझा निभाव झाला...

अनोळखी वाटतो जरी मी जगास आता,
तरी करावे जनाकरीता,ठराव झाला...

असत्य जुजबी,खरे टिकाऊ ,कळून आले
मनावरी चांगलाच माझ्या प्रभाव झाला...

कवि : अरविंद

Saturday, 22 May 2010

दे धक्का ब्लॉग चा दुसरा वाढदिवस

सर्वांना आमचा नमस्कार,

आज दे धक्का ब्लॉग हा आपला दुसरा वाढदिवस साजरा करत आहे, या २ वर्षाच्या प्रवासात ३,००,००० वाचक संख्या, ६००+ ई-पत्र वाचक आणि १२५ गुगल मित्र परिवार आणि तुम्ही दिलेले प्रेम हाच आमचा अनमोल ठेवा आहे. असेच तुमचे प्रेम पुढेही आमच्यावर ठेवा.

धन्यवाद

Thursday, 20 May 2010

Marathi Kavita : स्वर्गातले फूल

स्वर्गातले एक फूल, पृथ्वीवर अवतरले
घेऊनी ओंजळीत त्याला, निरखून मी हसले
फुलावरील दवबिंदूंन्ने, हळूच मज पाहिले
हृदय वेडे माझे, त्या पाकळ्यांमध्येच हरविले

येताच घरी त्याला, खिडकीपाशी ठेविले
क्षणात माझे सारे, जिवनंच त्यास अर्पिले
विश्वसाच्या धाग्याने, त्याच्याशी खूप बोलले
दु:खाच्या काळ्या ढगांन्ना, मी वेडी साफ विसरले

होताच संध्याकाळ मात्र, " ते " फुलसुद्धा कोमेजले
अचानक आयुष्यात माझ्या, हे अघटित कसे घडले
पुन्हा एकदा त्याच्याकडे, सुन्न मनाने मी पाहिले
आयुष्याच्या या प्रवासात, पुन्हा मी मागे एकटी उरले....
पुन्हा मी मागे एकटी उरले..........

कवि : सुरज

Wednesday, 12 May 2010

Marathi kavita : वळवाची सर

वळवाची सर
वळवाची सर
आली झरझर
मन चिंब झालं
त्याला फुटला पाझर

वळवाची सर
तिनं केलं गार गार
तिला घरट्यात घेण्या,
म्या बी उघडिल दार.

वळवाची सर
तिला कायली सोसना.
भिजउन गेली
भग्न कोरड्या मना.

वळवाची सर
आली तशी गेली.
जाता जाता वेडी
उभ्या पावसात न्हाली.

- रमेश ठोंबरे

Tuesday, 11 May 2010

विडंबन कविता : आयुष्यावर बोलू काही (संदीप खरे)

जरा चुकीचे... तरी बरोबर......
जरा चुकीचे, तरी बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
भीडले नाहीत डोळे तोवर, बोलू काही......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
हवे-हवे ते हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; पोरींवर बोलू काही......

"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
आज "हिचे" रे "तिचे"ते नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

Saturday, 1 May 2010

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

""जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा""

आज १ मे २०१०, अखंड महाराष्ट्र राज्य आपली ५० वर्षे पूर्ण करत आहे.

आज ह्या सुवर्ण महोत्सवी दिना निमित्त सर्व मराठी बांधवांना, मी, मनःपुर्वक शुभेच्छा अर्पण करतो.

|| जय हिंद || जय महाराष्ट्र ||

Thursday, 29 April 2010

Marathi Charoli Jugalbandi : मराठी चारोळी जुगलबंदी

भन्नाट चारोळ्या एकत्र करुन तयार झालेली जुगलबंदी खास तुमच्या साठी...

तुझेही पाय मातिचेच असतिल
याची जाणिव आधिच होती
म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !

तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

 मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

कळलच नाही कधी मला
तुझ ते आतल्या आत जळण
जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
तुझ एकटीचच तरफडण

जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
कारण तुझी कळी कधी खुललीच नाही
मिट्लेल्या ओठामागची
निःशब्द भाषा कळलीच नाही

ओठ जरी माझे मिटलेले
डोळे मात्र उघडे होते
तू ओठातून फूटणार्‍या शब्दाची वाट पहिली
पण डोळ्यानी ते कधीच वेक्त केले होते...

डोळ्यांनी व्यक्त केलेस
ते डोळ्यानिच ऎकले
पापण्या मिटता मिटता
आसवांनीच टिपले

आसवांची फुलेच दिलीस मला तु
मौन राखिले तरी
का डोळ्यात तुज्या सदा प्रश्नभाव
राजसा प्रीत माजी हि खरी 

खरी जरी असेल प्रित तुझी...
का केली नाही तु व्यक्त...
सदा वात बघण्यात तुझी...
आटले माझ्या देहाचे रक्त...
   

अव्यक्ताला व्यक्त होण्याची
वाट मीही पाहिली
तू या वाटेवर वळण्या आधिच
मग ही वाट का ग संपली

मी तर तेथेच होते वाट बघत....
तुझिच नजर ना वळली....
प्रित मझ्या मनाची सदा...
तुलाच ति का न कळली???

वाट होती अजून शिल्लक
प्रवासच संपला
ज्याचा त्याचा वाटा जितका
त्याचा त्याला मिळाला.

  स्रोत : orkut.com

Friday, 23 April 2010

Marathi Kavita : वेश्या

संध्याकाळी ८ वाजता ती मला मारून झोपवायची
तिला माझ्या दुसऱ्या दिवशीच्या भुकेची काळजी असायची

गज्र्यांच्या वासाने,अत्तराच्या घमघमाटाने माझ डोक दुखायच
चुर्गळलेल्या फुलांचं टोपलं माझ्या घरात नेहमीच असायचं

मामांना पाहिलं आहे मी आईची पप्पी घेताना
माझ्या समोर नाही म्हणताच ......लाथांनी मार खाताना

माझ्याघरी येणार प्रत्येक जण माझा मामाच होता
पण खाऊ साठी पाठीवरून फिरणारा हात मला खूप बोचत होता

आई दिवसभर झोपायची आणि रात्र भर मामासोबत गप्पा मारायची
मला नेहमी प्रश्न पडायचा मला फीस साठी इतके पैसे कुठून द्यायची

मी कॉलेज ला गेल्यावर सर्व मामा माझ्याशीच सलगी करू लागले
न मागताच माझ्या हातावर पाचशे/हजाराच्या नोटा ठेवू लागले

आईने माझ्या हातात जेव्हा ती नोट पहिली
काना खाली मारून माझ्या ओक्साबोक्सी रडू लागली

"केली चूक जी माझ्या आईने ती मला करायची नाही
नरकात माझ्या पोरी, तुला मला ढकलायचं नाही"

मला घडवण्यासाठी जिने नर्क भोगला ती माझी आई आहे
.............................जरी तुमच्या नजरेत ती वेश्या आहे.

कवि : राजेश जोशी

Thursday, 22 April 2010

Marathi Kavita : तुझे माझे नाते

तुझे माझे नाते आता मलाच कळत नाही....
शब्दात पकडू म्हणले तर शब्दच मला कळत नाहीत...

प्रत्येक तास, प्रत्येक मिनट... आता फ़क्त विरहाचाच आठवतो....
विसरुन जाउ म्हणले तर अश्रु बनुन ओघळतो....

तुझा भास आता जाणवत रहातो मनाच्या प्रदेशात....
पकदु म्हणले तर सगळा प्रदेश उजाड दिसतो....

अत्त फ़क्त मे तुझ्या साठी एककद दिव लावू शकतो...
आणि विझताना त्या दिव्यात आपले प्रेम बघु शकतो

Saturday, 17 April 2010

Marathi Kavita : हो हो मी पीतो...

प्यायला मी घाबरत नाही
बिनधास्त पीतो..
कूणी टवकारले डोळे ..
तर लटपटत पीतो...

प्रेमीजनां समोर पीणे नको
हा तसा बेवड्यांचा स्थाइभाव
करून सवरून लपवीणे
हा तर निव्वळ अहंभाव

सूरक्षीततेच्या नावाने
मनात नूसती चलबीचल
दिसताच सामोरी बाटली
दिलात होते गडबड

असेल जर खरे हे तर
उगाच कशाला लाजायचे?
सूटलाच जर निश्चय
तर सरळ जाऊन प्यायचे..

स्पर्श होताच लाजळू
पान मिटूनी घेते
मावळतो रवीराजा
अन फ़ूल कोमेजते

लाजळूने लाजावे
फ़ूलाने कोमेजावे
ह्यास का दोस्तांनो
कूणी पाप म्हणावे ?

पीणे हा बेवड्यांचा तर
चिरंतर स्वभाव...
बहाणा एक पूरे
मग नाही ठहराव..

पीणे नाही जिवनात
मग जगता कशाला
रस्ता ओलांडतांना
सिग्नल बघता कशाला?

जमेल तीतके प्यावे
उरलेच तर बाकीच्याना द्यावे
पीण्यासाठीच जन्म आपूला
उगा का प्यासे मरावे?

म्हणोत कूणी "बेवडा"
परी नाही चिडायचे
हो हो पीतो मी
असे छाती ठोकून सांगायचे...


--
मंदार (साद मनाची)

Thursday, 15 April 2010

Marathi Kavita : संवय जडलीय मला

संवय जडलीय मला ,
दुस-याच्या दुःखांना कवटाळून ,
आपलेच दुःख पोरके करण्याची...

सवय जडलीय मला ,
दुस-याच्या चिंता वाहून,
स्वतःच्या विसरायची.

सवय जडलीय मला ,
शांततेचा प्रसार करून,
स्वतःशी लढत बसायची...

सवय जडलीय मला ,
आपली कामें प्रलंबित ठेवून,
दुस-याची उरकून द्यायची...

सवय जडलीय मला ,
आपल्या अश्रूंना वाट दावून,
दुस-याची पुसत बसायची...

सवय जडलीय मला ,
दुर्जनात दडलेल्या,
सज्जनाला हुडकायची ...

सवय जडलीय मला ,
मरणाला भिक न घालता,
दुस-यासाठी जगण्याची...

सवय जडलीय मला ,
सर्वकांही विसरायची ,
पण रामास आठवायची ..


......अरविंद

Wednesday, 14 April 2010

Marathi Kavita : भाग्य माझे

कधी खूप आहे ,कधी ताट खाली
असे भाग्य माझे सदा घोळ घाली...

कसा लेख भाळी कुणा आकळेना
जपू गोड नाती,मनाची खुशाली...

झळा झेलल्या मी, कळा सोसल्या मी
सुखाची शिदोरी अनायास आली....

कधी ऊन होते कधी गार वारा
निशेच्याच मागे उषेचीच लाली...

किती कष्ट होवो, किती ताण येवो
मनाला म्हणालो, हसू ठेव गाली...

न मागे तयाला मिळे सर्वकांही
कृपा ही तयाची सदाचीच झाली...

जरी तो दिसेना कुठे आढळेना
तरी या जगाचा असे तोच वाली...

....... अरविंद

Thursday, 8 April 2010

Marathi Kavita : अविश्वास ही.........

अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
खरं माहीत झाल्यास
काय प्रतिक्रिया असेल त्याची
स्विकारेल की झिडकारेल
संभ्रमावस्थेत होती
प्रामाणिकपणा तर आपल्याला
कुणी शिकवलाच नाही
मग आज अचानक ही भावना
का आली उफ़ाळुन
कदाचीत माझं संस्कारक्षम मन
अजुनही जागे आहे
की प्रेमाची हलकी झुळुक
कारणीभुत झालीय?
काही का असेना ,मी माझा पुर्वैइतिहास
सांगणार,
माझ्या प्रेमाला अंधारात का ठेऊ मी?
अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
नाहीच मुळी..................



---कल्पी जोशी

Wednesday, 7 April 2010

Marathi Kavita : मी तुझ्याच छायेत

मी म्हणालो देवाला--
हाल माझे पहा जरा
आज्ञा झाली प्रतिप्रश्नाने--
आठव तुझी कृत्ये जरा

शोध शोध शोधले मी,
नाहीच गवसलास तू...
कुठे होतो मी तेव्हा,
आला होतास जेव्हा तू...

खूप भटकलो इतस्ततः
अरे,तुझं घर शोधायला...
माझ्यात अहंकार भरलेला,
भेटशील तू कशाला मला ?

तुझी सृष्टी, तुझे सौन्दर्य
पाहण्यात मी दंग आहे...
सवड नाही बघावयाला,
की,खरा 'मी' कोण आहे ?

कल्पनेचा खेळ,द्वैत संपले
तू माझ्यात,मी तुझ्यात रे!
तू छायाचित्रात माझ्या ,
मी तुझ्याच छायेत रे !

....... अरविंद

Saturday, 27 March 2010

Marathi Kavita : आई फ़क्त तुझ्यासाठी...

आई फ़क्त तुझ्यासाठी.......
बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......

कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा

airport वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...

प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...

इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...

ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....

थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...

सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...

अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....

सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार..पुन्हा कधीही मी परदेशी....


--पंकज सोनवणे

Friday, 12 March 2010

Marathi Katha : इच्छा

राधेच्या पायांतील शक्ती क्षीण होत चालली होती. आपण रस्ता चुकलो हे तिला जाणवत होते तरी काट्याकुट्यांची पर्वा न करता जिवाच्या आकांताने वेड्यासारखी धावत होती. अंग ठणकत होतं, डोळ्यांतील अश्रूंची संततधार थांबत नव्हती, कपाळातून रक्तही ठिबकत होतं, पायांत पेटके येत होते. काळोखात एक दोनदा तिने मागे वळून पाहिले. नवरा आपल्या पाठलागावर असावाच या विचारात तिने हमरस्ता केव्हाच सोडला होता आणि पाय नेतील तिथे ती धावत होती... श्वास फुलला, उर फुटायची पाळी आली, पुढे एकही पाऊल टाकणं अशक्य झालं तशी रानातल्या एका मोठ्याशा दगडावर तिने बसकण मारली.

धाय मोकलून रडावं अशी इच्छा अनावर होत होती पण त्याहूनही प्रबळ इच्छा घरी परतायची होती. घरी... तिच्या हक्काच्या घरी, तिच्या आई-बाबाच्या. राधेच्या डोळ्यासमोरून गेल्या काही महिन्यांतल्या घटना तरळून गेल्या.

राधाची बारावी झाली तशी बाबांना आपल्या लाडाकोडात वाढलेल्या पोरीच्या लग्नाचे वेध लागले होते. पुढे शिकायची राधाची इच्छा होती पण आईबाबांना तिला एकटीला लांब तालुक्याच्या गावी पाठवायचे नव्हते. फार पुढे शिकून करायचे तरी काय होते म्हणा, चांगल्या भरल्या घरात पोरीला दिली की घरदार, जमीनजुमला हेच सांभाळायचं होतं. सहा महिन्यांपूर्वी साखरगावच्या सावंतांच्या मुलाशी, राजा सावंताशी तिचं लग्न ठरलं तेव्हा आई-बाबा किती आनंदात होते. थाटामाटात त्यांनी आपल्या एकुलत्या एका लेकीचं लग्न लावून दिलं होतं. सावंतांची भरपूर शेतीवाडी होती. पोरीला कशाची ददात पडणार नाही असं बाबांना वाटत होतं. लेकीला लग्नात चांगले ठसठशीत दागिने केले होते, जावयाला नवी मोटरसायकलही घेऊन दिली होती. सासू सासरे, नणंद, सासरची इतर मंडळी सर्वांचा मान ठेवला होता. काही करायचं म्हणून कमी ठेवलं नव्हतं. राधाही आनंदात होती. नवरा देखणा होता, शिकलेला होता. सासरचा वाडाही चांगला ऐसपैस होता. नणंद तिच्याच वयाची होती. लग्नानंतर दोन महिने कसे भुर्रदिशी उडून गेले ते राधाला जाणवलंही नाही. घरात सासू-सासरे तिला प्रेमाने वागवत होते. नवराही लाड करत होता. नणंदेशी चांगली मैत्री जमली होती. 'आपली दृष्ट तर लागणार नाही ना या आनंदाला?' असे चुकार विचार राधेच्या मनात येत. एके दिवशी रात्र होऊ लागली तरी नवरा घरी परतलाच नाही. रात्र पडली तशी राधेने सासूकडे विचारणा केली पण तिने ताकास तूर लागू दिली नाही. इतरवेळेस दिलखुलास गप्पा मारणार्‍या नणंदेनेही 'दादा शेतावरच झोपला असेल.' असे म्हणून वहिनीची बोळवण केली. त्या रात्री राधेच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसर्‍या दिवशी सकाळीच नवरा परतला. राधेने त्याला विचारणा केली तशी त्याने तिला उडवून लावले. 'शेतावर काम होते, परतायला उशीर झाला' असे काहीतरी त्रोटक उत्तर दिले.

हा प्रकार त्यानंतर नेहमीच होऊ लागला. आठवड्यातून दोन-चारदा नवरा गायब होत असे. घरातल्या गडीमाणसांकडून राधेच्या कानावर हळूहळू एकएक गोष्टी येऊ लागल्या. खालच्या आळीत नवर्‍याचे प्रकरण होते म्हणे. घरातल्या कोणालाही ते पसंत नव्हते पण करतात काय? लग्नानंतर पोरगं ताळ्यावर येईल असे सर्वांना वाटायचे. राधेला या प्रकाराची कुणकुण लागली तशी तिने सासूला स्पष्टच विचारले. सासूने कोणतेही आढेवेढे न घेता गोष्ट कबूल केली. एक मूल झालं की सगळं बरं होईल. राजा मनाने चांगला आहे. तो ताळ्यावर यावा असंच आम्हाला वाटतं. संसारात पडला की जबाबदारी येईल. सासर्‍यांनीही सुचवलं की वंशाला दिवा लवकर येऊ दे. राधेला थोडा धीर वाटला. सासू-सासरे म्हणतात तोही उपाय करून पाहायला तिची हरकत नव्हतीच. दरम्यान नवरा राधाला घेऊन तिच्या आईबाबांना भेटून आला. राधेने या प्रकाराची त्यांना कल्पना दिली नाही. उगीच त्यांच्या जिवाला घोर का म्हणून ती गप्प राहिली. पुढचे काही महिने असेच निघून गेले. सहा आठ महिन्यांत काही नवीन घडलं नाही तशी सासर्‍यांनी तालुक्याला जाऊन तपासणी करून घ्यावी असे सुचवले. राधाला घेऊन नवरा तालुक्याला जाऊनही आला. तपासणीत राजात दोष असल्याचे आढळले. वैवाहिक जीवनात तशी बाधा नव्हतीच, हा दोषही योग्य औषधोपचाराने दूर होण्यासारखा होता. राजाला मात्र हे काही केल्या पटेना. "डॉक्टर लेकाचे काही बाही सांगतात. मी पूर्ण पुरुष आहे. तुलाच नाही आणि चार बायकांना नांदवेन मी. मला कोणत्या औषधोपचारांची गरज नाही."आणि तेव्हापासून घरातली सगळी चक्रं उलटीपालटी फिरायला लागली. सासर्‍यांनी राधाशी बोलणं सोडलं. सासू तिला कोणत्याही कामाला हात लावू देईना. बोलली तर घालून पाडून काहीतरी बोलत असे. नणंदही दूर दूर राहत असे. राजा तर तिचा जणू दुःस्वासच करत होता. सरळ शब्दांत बोलणं त्याने सोडून दिलं होतं. रोज काही ना काही कारण काढून भांडण सुरू करे. एक दोनदा तिच्यावर हातही उगारला होता. राधेचं जगणं कठिण होऊ लागलं होतं. आई-बाबांकडे जावं, एकवार त्यांना भेटूनतरी यावं अशी इच्छा होत होती. तसे तिने नवऱ्याकडे, सासूकडे बोलूनही दाखवले होते परंतु तिला उडवाउडवीची उत्तरे मिळत.

असेच एके दिवशी राजा रात्र बाहेर काढून सकाळी परतला तसा राधेने त्याला जाब विचारला. 'नांदवायचं नसेल तर घरी सोडून या. आईबापाला मी जड नाही.' म्हणून सांगितलं. शब्दाला शब्द वाढत गेला. राधाही हट्टावर आली होती. राजाने हात उगारला, "घरी जायचंय? जाऊन त्यांना माझ्याबद्दल सांगायचंय? गावात आमच्या घराचं नाव बद्दू करायचंय? थांब! घराबाहेर पडता येणार नाही अशी दशा करेन तुझी." सट्टदिशी थोबाडीत ठेवून दिली तशी "आई गं!" म्हणत राधा खाली बसली. राजाच्या अंगात जसा राक्षस शिरला होता. त्याने लाथा बुक्क्यांनी तिला बडवायला सुरुवात केली. राधा बेंबीच्या देठापासून ओरडत होती पण सासू तिच्या वाटेला फिरकली देखील नाही. राजाने तिचा हात धरला आणि तिला फरफटवत तो गोठ्याच्या दिशेने घेऊन गेला. गोठ्याच्या मागच्या बाजूला धान्य साठवायची खोली होती. त्यात त्याने राधाला ढकलले. "घरी जाऊन बापाला काय सांगशील? नवरा, नवरा नाही म्हणून? माहेरी कशी जातेस बघू. जीव घेईन माहेरचं नाव पुन्हा काढलंस तर. याद राख. राहा पडून या अंधारवाड्यात. डोकं ताळ्यावर येतं का ते बघ."

दरवाज्याला बाहेरून कडी घालून राजा निघून गेला. त्या अंधार्‍या खोलीत राधाचा जीव घाबराघुबरा झाला. मार खाऊन अंग आणि डोकं दोन्ही बधिर झाले होते. त्या अंधारसाम्राज्यात दिवसाढवळ्याही उंदीर घुशींचे साम्राज्य असते या विचाराने तिचा थरकाप उडत होता. अंगाचं मुटकुळं करून ती तिथेच पडून राहिली. पायावरून चुकचुकत काहीतरी गेल्यासारखं वाटलं तसे तिने पाय छातीशी गच्च धरले.

थोड्यावेळाने उठून ती दारापाशी गेली आणि तिने दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. 'मला सोडवा इथून. मला माझ्या घरी जाऊ दे. दार उघडा.' बराच वेळ असा धोशा लावूनही कोणी आले नाही तशी ती थकून ढोपरांत डोकं खुपसून मुसमुसत खाली बसली. किती वेळ निघून गेला असावा कोणास ठाऊक, अचानक दरवाजापाशी कोणीतरी असल्याची चाहूल तिला लागली.

दरवाजा करकरत उघडला. बाहेर अंधारून आले होते. नणंदेने येऊन दरवाजा उघडला होता. राधेने तिला गच्च मिठी मारली आणि ती रडू लागली.

"वहिनी, मी दरवाजा उघडला हे घरात कोणाला माहित नाही. तू इथून पळून जा." नणंद तिच्या कानात कुजबुजली आणि तिने नोटांची पुरचुंडी राधाच्या हातात कोंबली. राधेने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. "दादा आणि आई बोलत होते. त्यांना या गोष्टीचा बोभाटा नकोय. तुझ्या बायकोला परत धाडली तर आपली अब्रू जाईल, त्यापेक्षा तिची विल्हेवाट लावू, असं म्हणत होती आई."
"काय?" राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
"गावात बभ्रा नको. स्टोव फुटला आणि आग लागली असं सांगता येईल."
"नाही, नाही. मला मरायचं नाही. मला माझ्या आईबाबांकडे जायचंय."
"तू जा वहिनी. इथे थांबू नकोस. दादा परत यायची वेळ झालीये. तो इथे आला तर काहीच करता येणार नाही.""या वेळेला कुठे जाऊ? रात्र होत आलीये."
"मला नाही माहित, पण तू जा. मी नाही थांबू शकत अधिक वेळ इथे कोणीतरी यायचं." असं नणंद म्हणायला आणि.... "बाहेर कशी आली ही बया?" राजाचा करडा आवाज कानावर यायला एकच वेळ साधली. राजा तरातरा धावत आला आणि त्याने राधेचा हात पकडला. "चल, तुला आज इंगा दाखवतो." म्हणून तो राधाला खेचायला लागला. राधा अचानक झालेल्या हल्ल्याने गळपटून गेली होती.

"नको दादा, सोड तिला, जाऊ दे तिला. सोड," नणंदेने आरडाओरडा सुरू केला तशी राधा भानावर आली. राजा बहिणीशी हुज्जत घालत होता ती संधी साधून तिने त्याच्या हाताला जोरात झटका दिला आणि ती अंगात वारं भरल्यागत धावू लागली.

आपण कोठे धावतो आहोत, कोठे जात आहोत याचा तिला अंदाज येत नव्हता. राजा आपल्यामागून येत असणार याची तिला खात्री होती परंतु ती खात्री करून घ्यायला क्षणभरही थांबली नाही. गाव संपून झाडी सुरू झाली तशी आपण रस्ता चुकलो आहोत याची जाणीव तिला झाली. अंधार चांगलाच दाटून आला होता. आपण चुकीच्या दिशेने धावत आलो, एस्टी स्टॅंडच्या दिशेने गेलो असतो तर एस्टी पकडता आली असती असा विचार तिच्या डोक्यात आला. पण राजा तेथे पोहोचला असता. एस्टी पकडायच्या आधीच राजाने तिला ताब्यात घेतलं असतं. तिचे पाय आता बोलत होते, श्वास फुलला होता. ती क्षणभर थांबली आणि तिने मागे वळून पाहिले. मागून कसलीही चाहूल लागत नव्हती.


'काय झालं आपला पाठलाग नवर्‍याने थांबवला का असावा?' असा विचार करताना तिला अंधुक प्रकाशात तो दगड दिसला. पुढे जाणं अशक्य झालं होतं म्हणून राधा शेवटी त्या दगडावर विसावली. 'मला मरायचं नाही. मला घरी जायचं आहे. आईकडे.' तिच्या मनात पुन्हा इच्छा दाटून आली पण एकही पाऊल पुढे टाकण्याची शक्ती तिच्यात उरली नव्हती. तिला हुंदका फुटला. तिने पदर तोंडात कोंबला आणि त्या दगडावर आपलं डोकं ठेवून ती निपचीत पडली. मध्यरात्र उलटून गेली होती. चंद्र आकाशात चांगला वर आला होता. दोन दिवसांपूर्वीच पौर्णिमा होऊन गेली होती. चंद्राचा मंद प्रकाश रानाला न्हाऊ घालत होता. हवेची थंडगार झुळुक आली तसे राधेने आपले अंग आक्रसून घेतले. थोड्यावेळाने तिने हळूहळू डोळे उघडले. बहुधा अतिश्रमाने डोळा लागला होता. घडल्या घटनेची आठवण झाली तशी ती खाडकन उठून बसली आणि कावरीबावरी होऊन इथे तिथे पाहू लागली. रानात सगळं कसं शांत होतं. मध्येच रातकिडे ओरडत होते आणि हवेच्या मंद झुळुकीबरोबर पानांची सळसळ ऐकू येत होती तेवढीच.


'मला घरी जायचंय. आई आणि बाबांना भेटायचंय.' राधाच्या मनात पुन्हा इच्छा उचंबळून आली. 'जायचं तरी कुठे या रानात? रस्ताच माहित नाही. तांबडं फुटलं की कळेल कोठे आलो ते.' तिने बसलेल्या दगडाकडे निरखून पाहिलं. शुभ्र चंद्रप्रकाशात तो पाषाण उठून दिसत होता. राधेला त्या काळ्या फत्तरावर हाताचा शुभ्र पंजा चमकताना दिसला.

'चेटकिणीचा दगड.' ती धडपडून उभी राहिली. आता फक्त ब्रह्मांड आठवायचे बाकी होते. 'हे आपण कुठे आलो?' गावाबाहेरच्या रानात चेटकीण राहते अशी वदंता तिने ऐकली होती. एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री तिचा मृत्यू या पाषाणावर झाला. तिने आपला तळवा त्या पाषाणावर जेथे टेकवला होता तेथे गावकर्‍यांना दुसऱ्या दिवशी तो पंजा पाषाणावर उमटल्याचे दिसून आले. आजही रात्रीबेरात्री हिरवी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली, मळवट भरलेली ती चेटकीण लोकांना धरते असा समज होता. अंधार पडल्यावर रानाच्या दिशेने कधी कोणी गेल्याचं ऐकलं नव्हतं. राधेचं अंग शहारून गेलं. राजा आपल्यामागे का आला नाही याचा उलगडा तिला होऊ लागला आणि जीव मुठीत घेऊन ती वेड्यासारखी पुन्हा धावायला लागली.

किती वेळ गेला कोणास ठाऊक...समोरून कोणीतरी कंदील घेऊन येत होते. पुढचा मागचा कोणताही विचार न करता राधा त्या दिशेने धावत सुटली.

"कोन हाय?" कंदील धरलेल्या व्यक्तीने राधाच्या चेहर्‍यासमोर कंदील धरला. राधाच्या तोंडातून एक अस्फुट किंकाळी फुटली. समोर धारदार नाकाची, कमरेत वाकलेली, तोंडाचं बोळकं झालेली, सुतरफेणीसारख्या चंदेरी केसांची म्हातारी उभी होती.

"कोन म्हनायचं? एवड्या रातच्याला या रानात कुटुन आलसा?" म्हातारीने खणखणीत आवाजात विचारले. भीतीने राधाची बोबडी वळली होती. तिच्या तोंडून आवाज फुटेना. "पोरी! ह्या आडरानात रातीची काय करतीस? काय इचारते हाये म्या तुला? बोल की."

"र..र..रस्ता चुकले. मला घरी जायचंय. प..पण तुम्ही कोण?" "म्या हितं रानाच्या भायेरच र्‍हाते. गंगाक्का नाव माजं. रातच्याला येक शेळी या रानात शिरली माजी. तिला हुडकायला निगाले तर तुज्यावर नजर पडली."

"इ...इ..इतक्या रात्री शेळी शोधायला?"

"त्यात काय मोटं? किती वर्स जाली हितं र्‍हाऊन, रानाची भीती न्हाई वाटत आता." म्हातारी ठसक्यात म्हणाली.

"आणि ती चेटकीण... हे चेटकिणीचं रान आहे ना?"म्हातारीने डोळे बारीक करून राधेकडे निरखून पाहिलं. "व्हयं! ह्ये चेटकिनीचं रान हाय, पर त्यात चेटकीन न्हाय... वावडी हाय फकस्त. पर तू हितं रातच्याला काय करतीस? आसा कसा रस्ता चुकली?"

राधेला थोडा धीर आला. "खरंच रस्ता चुकल्ये हो. मला माझ्या घरी जायचं आहे. माहेरी. माझ्या आईबाबांकडे, भिवपूरला."

"भिवपूरची कोन गं? कोन्च्या घरातली? आन रानातून पायी पायी कुटं भिवपूर गाठाया निगालीस?"
म्हातारीच्या प्रश्नांना आता सविस्तर उत्तरे देणे भाग होते. राधेची भीड चेपली होती. म्हातारीचा आवाजही मऊ झाल्यासारखा वाटला.

"तुम्हाला भिवपूरची माहिती आहे?"

"म्हाईती हाय मंजी? म्या पन भिवपूरातलीच हाय. सदा पाटलाला वळखतीस? मी त्याची धाकली आत्या हाय. दादा व्हता तेवा जानं व्हायचं, दादा गेला माजं पन वय जालं, सत्तरी उलटली. कोन जातया कोनाकडं उटून आता? पर सदा भेटला तर त्याला सांग की आत्याने आठवन काडली. बरं आता हितं उबं राहन्यापरीस तुला बाजूच्या गावात पोचवते, तितं एश्टी पकड पहाटेची, ती नेईल तुला भिवपूरला." "तुम्ही सदाकाकाच्या आत्या? सदाकाकाची माझ्या बाबांशी चांगली ओळख आहे." राधाला हायसं वाटलं. चालता चालता तिने आपल्यावर गुदरलेल्या सर्व गोष्टींबद्दल म्हातारीला सांगायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशात म्हातारीच्या डोळ्यांतील करुणा दाटत आलेली दिसत होती. राधेने आपली कहाणी संपवली तसं म्हातारीने तोंड उघडलं,

"बाय माजी धीराची. या चेटकिनीच्या रानात रातची र्‍हायलीस तवाचं आलं ध्यानात की कायतरी घोटाला हाय. तुज्या घरची मानसं तुज्यामागं आली पन नाईत या रानात. आस्सा दरारा हाय चेटकिनीचा. चल म्या सोडते तुला."

"पण तुमची शेळी?"

"आगं या शेळीपुडं ती शेळी मोटी न्हाय. ती येईल घरला. या रानात कोन लांडगा न्हाई येत."

"आणि ती चेटकीण?" राधाने चाचरत विचारलं.

"कोन्ची चेटकीन? कोन चेटकीन बिटकीन न्हाय हितं."

"पण मी दगडावर पंजा पाहिला. चेटकिणीचा पंजा." त्या आठवणीने राधाला पुन्हा शहारून आले.

"हां! दगडावर पंजा हाय खरा पर तो हाय भाऊ मोहित्याची बायकोचा आन ती प्वार चेटकीन नवती."

"भाऊ मोहिते? म्हणजे आमच्या साखरगावचे? त्यांची बायको? म्हणजे?" राधेला फारसे काही कळले नाही.

"पावलं उचल झटाझट. सांगते वाटेवर." गंगाक्का म्हणाली, "भाऊ मोहित्याचं लग्न झालं, बायको घरात आली. सारं कसं आलबेल व्हतं. पर दुर्दैव त्या पोरीचं. म्हैन्याभरात जावेचं तान्हं पोर गेलं. पांडर्‍या पायाची अवदसा घरात आली म्हनून जावेने शिमगा केला.... आन पोरीचं नशीब आसं फुटकं की गावात कसलीशी साथ आली आन दोन-चार ल्हान पोरं दगावली. भाऊ मोहित्याची बाय चेटकीन हाय म्हनून कोनी वावडी उटवली म्हाईत न्हाय पर थंडीच्या एका रातीला गावातली मान्सं वाड्यावर चालून आली. घरच्यानी पन साथ नाय दिली तिची. ती पोरगी वाट मिळलं तशी धावत सुटली आनी या रानात आली. आक्षी तुज्यावानी." म्हातारीने राधेवर नजर रोखून म्हटले. "तिला बी तिच्या घरला जायचं आसलं पर रस्ता नाय गावला बिचारीला. थंडीचं दिवस व्हतं. रातच्याला कडाक्याची थंडी पडायची. नाजूक प्वार ती, गारठून गेली त्या दगडावर. सकाळी लोकांना गावली, शरीर बरफावानी कडक जालं व्हतं आनी व्हय! पंजा उमटला व्हता त्या दगडावर. कसा तो न्हाई म्हाईत, पन अजून सुदीक हाय तसाच हाय. त्या रानातच क्रियाकरम केलं तिचं. गावात पन नाय आनली तिला. तवापासून कदीतरी रातच्याला दिसते म्हनतात."

"तुम्हाला दिसली का हो कधी गंगाक्का ती?" राधेने कुतूहलाने विचारले.

"मला तू दिसलीस. तुला पन तिच्यावानी घरला जायचं हाय. तू पन रातच्याला त्याच गावातून येतीस, त्याच दगुडावर बसतीस. मग काय म्हनू म्या?" तोंडाचं बोळकं उघडून म्हातारी जोरात हसली.

"मला कुठे जायचं ते कळलं नाही अंधारात. या रानात कशी आले तेही कळलंच नाही. डोक्यात एकच होतं की माहेर गाठायचं. मीच ती चेटकीण आहे असं नाही ना वाटलं गंगाक्का तुम्हाला."

"न्हाई, कोन चेटकीन न्हाई. तू न्हाईस आन ती पन न्हाई, गरीब प्वार होती बिचारी, कदी कोनाला तरास दिला नवता तिनं, नशीब तिचं.... आडवं आलं...पन तू घरला जाशील." लांबून कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकू येत होता. "गाव आलं, पहाट पन व्ह्यायला आली. चल, झटाझट... पारावर पैली एश्टी मिळंल." अंधार ओसरायला लागला होता. आकाशातले तारे मंद होत होते. क्षितिजावर कोठेतरी केशरी छटा येऊ लागल्या होत्या.

लांबून पार दिसू लागला तसा म्हातारीने राधाचा निरोप घेतला. "निगते आता. मला घरला परतायला हवं.. . मोप काम बाकी हाय.""गंगाक्का तुमचे उपकार विसरणार नाही जन्मभर. देवासारख्या आलात धावत, काय झालं असतं त्या रानात भीतीने माझं?" राधेच्या डोळ्यांत पाणी तरारलं."व्हयं पन मी व्हते तितं आन आले तुज्या मदतीला. माजं येक काम कर पोरी. तुज्या सदाकाकाला सांग गंगाक्का भेटली व्हती म्हनून. किती वर्सांत भेट न्हाई जाली. त्याला खुशाली सांग, या म्हातारीची इत्की इच्चा पुरी कर." "घरी गेले की लगेच निरोप धाडते सदाकाकाला," राधा हसली. दूरवरून मातीचा लोट उडताना दिसला. एस टी येत आहे हे ध्यानात आलं तशी राधा पारापाशी धावली. एसटीत बसल्यावर खिडकीतून तिने नजर फिरवून सभोवार पाहिले पण गंगाक्का कधीच निघून गेली होती.

सकाळच्या प्रहरी राधाला दारात उभी पाहून आईला धस्स झालं. राधेने तिला आपली कर्मकहाणी ऐकवली तशी आईने तिला कुशीत घेतलं. बाबांना शेतावर निरोप धाडला होताच. बाबा हातातली कामं सोडून धावत आले. राधेला पाहून त्यांना भडभडून आलं, "सावंतांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. पोरीच्या जिवाचं बरं वाईट झालं असतं तर गोळ्या घातल्या असत्या एकेकाला. सोडणार नाही." चिडून बाबा बोलत होते. राधेच्या आईने आणि राधेने खूप वेळ समजूत घातल्यावर ते शांत झाले.

ऊन्हं उतरली तशी राधेने बाबांना म्हातारीचा निरोप सदाकाकाला पोहचवण्याविषयी सांगितले. बाबांनी तोपर्यंत म्हातारीकडे विशेष लक्ष दिलेच नव्हते. राधेने गळ घातली तशी त्यांनी विचारले, "काय नाव म्हणालीस, सदाच्या आतेचे?"

"गंगाक्का, सदाकाकाची धाकटी आत्या आहे असं म्हणत होती."

"सदाची धाकटी आत्या?" बाबांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. "तू चल माझ्याबरोबर सदाकाकाकडे. गंगाक्काचा निरोप तूच सांग."

राधेने तोंड धुतले, साडी बदलली, केस विंचरले आणि ती बाबांसोबत सदाकाकाकडे निघाली. सदाकाका ओसरीतल्या झोपाळ्यावर आराम करत बसले होते. डावा पाय जमिनीवर रेटून झोपाळ्याला सावकाश झोका देत होते. राधेला आणि तिच्या बाबांना बघून ते उभे राहिले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले.
राधेच्या बाबांनी त्यांना थोडक्यात घडला वृत्तांत सांगितला. तो ऐकताना सदाकाकांच्या चेहर्‍यावरील रेषा सरासर बदलत होत्या. "वाचलीस पोरी! नाहीतर, काय वाढून ठेवलं होतं तुझ्या नशिबात ते देवाला माहित... पण तुला गंगाक्का दिसली हे खरं कसं मानायचं?" "अहो काका, दिसली म्हणजे? दिसली, बोलली, तिच्याबरोबरच एस्टी स्टॅंडकडे आले मी. तुमची आठवण काढत होती. सदाकाकाला निरोप दे म्हणत होती." सदाकाकांच्या प्रश्नातली गोम राधेला कळेना.

सदाकाकांनी राधेच्या डोक्यावर हात फिरवला, "गंगाक्काच्या लग्नात ४ वर्षांचा होतो मी. तिचा चेहराही आठवत नाही. साखरगावच्या मोहित्यांच्या घरी दिली होती तिला. पुढे काय झालं कळण्याचं वय नव्हतं पण एक दिवस बा धाय मोकलून रडत होता. गंगाक्काचं काय केलं त्या मोहित्यांनी ते कळायलाही मार्ग नव्हता. अचानक सांगावा धाडला की गंगाक्का गेली.

नंतर आजा, काका आणि बा विचारपूस करायला गेले होते, त्यांना मोहित्यांनी आमच्या गळ्यात धोंड बांधलीत असं सांगून बखेडा उभा केला. गावात गंगाक्का चेटकीण आहे असा आधीच बोभाटा झाला होता. आज्याने निमूटपणे तिथून पाय काढला. गंगाक्का गेली होती आणि त्या गावात काही बोलायची सोय राहिली नव्हती. त्या दिवसापासून गंगाक्काचा विषय घरात कोणी काढला नाही पण आम्हाला माहित होतं की गंगाक्का चेटकीण नाही. साधीसरळ होती आमची आत्या." सदाकाकांचा आवाज कापरा झाला होता.

राधेच्या अंगावर काटा फुलला होता, "म्हणजे मला भेटली ती गंगाक्का.... ती रानातली ... च.." तिला पुढे काय बोलावे ते सुचत नव्हते. "नाय पोरी! तुला भेटली ती इच्छा. तुझी इच्छा आणि तिची इच्छा. तुझ्यावाणी गंगाक्काही धावत सुटली होती. जीव वाचवायला, आपल्या घरी परतायला, नशीब तिचं.. नाही झालं तिच्या मनासारखं पण त्या इच्छेने तुला घरी आणलं, जे गंगाक्काला जमलं नव्हतं ती तिची इच्छा आज पुरी झाली."

Thursday, 11 March 2010

Marathi Kavita : निसर्ग ३

जळराशी सा-या बरसत याव्या
अन मी त्या अश्रूंनी झेलाव्या
पसरत पसरत विरुन जाव्या
अंगी माझ्या जिरुन जाव्या

निबिड वनांतुनी यावे वादळ
एकलेच परी घेऊन वर्दळ
उतरत रहावे अंतरामधुन
घोंघत जावे नसानसातुन

अथांग झेलीत निसर्ग सारा
वाटे पिऊन टाकु नुसता
पहाड दाटेल, नदी साठेल
झाडाखाली उठता बसता

- राज

Monday, 8 March 2010

Marathi Kavita : निसर्ग २

वळीवाचा पाऊस आला
अन शांत निजलेली जागली पाखरं

सरींच्या असंख्य आरश्याचा
सडा पडला जमिनीवर

सुर्यबिंब ही मानुन हार,
मंदावले आहे
नी लपले आहे ढगाआड

न सांगता आलेल्या पाहुण्यासारखे
मी ही केले नाही त्याचे स्वागत
नुसताच वळलोय दुस-या कुशीवर

कुठेतरी वर्षोनवर्षे तप करणा-या
चातकाला मात्र झालाय अगणित आनंद

आम्ही फ़ुके त्रस्त
झालो असलो तरी

एकटा तोच तृप्त आहे

- राज

Saturday, 6 March 2010

Marathi Kavita : निसर्ग १

आवडतं त्यांना
वाट काढत जायला झाडातुन

नदीचे घाट जाताहेत
वाहत निसर्गाच्या डोहातून

आणि पाणवठ्यापाशी
उभी आहेत दुतर्फ़ा
असंख्य हिरवीगार कुरणं...
तिच्या रक्षणाखातीर..

नदी म्हणे बदल्यात त्यांना देते
बहरलेलं हिरवेपण

आणि पाऊस बसतो त्यांवर
मांडून टिंबाचा खेळ

एका घरचे नसले तरी आहेत
एकाच कुटुंबातील सारे

- राज

Thursday, 25 February 2010

Marathi Kavita : तो चंद्र अजूनही...

तो चंद्र अजूनही आहे तिष्टत
तू परतण्याची वाट पाहत
लवकर निघून ये रे आता
अजून वाट नाही पाहवत

बघ न ! कसे आहेत सगळेच हसत
नेहमीच असतात मला चिडवत
मी पण आता त्यांना नाही रागवत
कारण तू तर नाही न आता मजसोबत

कंठ दाटला कि आसवही न विचारता येतात
अन मग एकांतात मला सोबत करतात
नाही रे अजून वाट पाहण जमत
तो चंद्रही बघ ! अजूनही आहे तिष्टत

-

कोमल

Monday, 22 February 2010

Marathi Kavita : हल्लीच्या पोरी

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

'ईश्य' म्हणून मान खाली घालताच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

"नवीन ड्रेस का ग?"विचारलं तर येतो त्यांना संशय
"नाही रे जुनाच" म्हणून बदलतात त्या विषय.

नकट्या रागावर लटका राग दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

मी घाऱ्या डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही गालात खुदकन हसावे
कसले काय, आजकाल गालांना खळ्या पडतच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

उद्या घोड्यावर होऊन स्वार येईल एक उमदा तरुण
"होशी का ग माझी राणी ?"विचारेल हातात हात घेऊन
गोड गोड स्वप्ने यांना आता पडतच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

पोरं लग्नाची झाली म्हणून घरी आईबाप काळजीत
'माझा नवरा मी केव्हाच शोधलाय' त्या दिक्लेअर करतात ऐटीत
घरून होकारासाठी थांबतच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत.

पेपरात आलेली कविता त्यावर मी केलेले प्रतिउत्तर

हल्लीच्या पोरी

आजकालची पोर पोरीं वरची नजर हटवतच नाहीत
पोरींनी इश्य ... म्हणून मान खाली घातली तर
मान वर काढता येणारच नाही
म्हणून हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

आत्मविश्वास आणि हुशारीने खुलते मुलींचे लावण्य
म्हणून जुने ड्रेस हि नवीन दिसतात त्यांच्यावर नगण्य
म्हणूनच कोणी "नवीन ड्रेस का ग?" विचारलं तर येतो त्यांना संशय
मग स्वतःच्याच सौंदर्याचे काय कौतुक करावे म्हणून बदलतात त्या विषय
लावण्य साज श्रुंगार आहेत दागिने जरी स्त्रीचे तरी
त्याच्याच मागे राहून स्वतःचे अस्तित्व मूली गमावत नाहीत
म्हणून हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

हल्लीची पोरं एकीवर प्रेम करून थांबतच नाहीत
तुझे गाल गुलाबी आणि तुझे घारे डोळे
तुझे ओठ लाल आणि केस तुझे कुरळे
असे कौतुक पोरांकडून आता पोरींना नवीनच नाही
म्हणून हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराचे स्वप्नं जरी सुंदर
तरी वास्तव पाहता ते झाले आहे धूसर
हल्लीची पोर बाईक वरून खाली उतरतच नाहीत म्हणून
घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराची स्वप्न पोरी पाहताच नाहीत
आणि हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

पोरं लग्नाची झाली तरी आता आईबाप काळजीत पडतच नाहीत
कारण हल्लीच्या पोरी आई-बापावर ओझं बनतच नाहीत
स्वकर्तुत्वाने व हुशारीने त्या आर्थांजन करतात आणि
स्वखर्चासाठी इतरांवर अवलंबून राहातच नाहीत
म्हणून हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

-- 

Bhagyashree

Thursday, 14 January 2010

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...

प्रिय मित्रांनो,

मकर संक्रातीच्या तुम्हाला ह्रार्दीक शुभेछा ....

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...

























तुमचा मित्र,
सुनिल सुखदेव जाधव